बेळगाव लाईव्ह : बेळगाव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (BIMS) येथील कम्युनिटी मेडिसिन विभागातील तिसऱ्या वर्षाची पदव्युत्तर विद्यार्थिनी डॉ. मंजुळा पी. हिने कर्नाटक असोसिएशन ऑफ कम्युनिटी हेल्थच्या ३५व्या राज्यस्तरीय परिषद (KACHCON 2025) मध्ये PG Oral Presentation या विभागात तिसरा क्रमांक पटकावून संस्थेचे नाव उज्ज्वल केले.
“Expanding Horizons in Community Medicine: Embracing the Future” या मुख्य विषयावर आधारित या परिषदेत राज्यभरातील पदव्युत्तर विद्यार्थी, प्राध्यापक आणि सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञांनी सहभाग नोंदवला.
डॉ. मंजुळा यांनी “Impact of Peer-Led Education on Knowledge, Attitude and Practices Regarding Gender-Based Violence Among High School Girls in an Urban Area – An Interventional Study” या विषयावर सादरीकरण केले.
डॉ. अश्विनी चिंगळे (सहाय्यक प्राध्यापक, कम्युनिटी मेडिसिन विभाग, BIMS बेळगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या अभ्यासाचे विषयाचे महत्त्व, संशोधन पद्धती आणि सामाजिक परिणाम याबद्दल परिषदेत विशेष कौतुक करण्यात आले.
उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल डॉ. मंजुळा यांना पदक व रु. ५,००० चे पारितोषिक प्रदान करण्यात आले.
डॉ. आर. जी. विवेकी (प्राध्यापक व विभागप्रमुख, कम्युनिटी मेडिसिन), डॉ. अशोक कुमार शेट्टी (संचालक, BIMS) तसेच शिक्षक व कर्मचारीवर्गांनी डॉ. अश्विनी आणि डॉ. मंजुळा यांचे अभिनंदन केले आणि संशोधन टीमच्या सामाजिक आरोग्यासाठीच्या कार्याचे कौतुक केले.
संस्था सार्वजनिक आरोग्याशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर संशोधन करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत राहील, असे BIMS प्रशासनाने सांगितले.


