बेळगाव लाईव्ह :बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील चिक्कबागेवाडी गावात झालेल्या भीषण अपघातात एका युवकाचा मृत्यू तर तर एकाची अवस्था गंभीर आहे.
बेळगावहून बैलहोंगलकडे जात असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी विजेच्या खांबावर जाऊन धडकली त्यामुळे हा अपघात घडला आहे.
या अपघातात स्विफ्ट डिझायर ही कार पूर्णतः चक्काचूर झाली. कारमध्ये चार जण प्रवास करत असल्याची माहिती मिळाली आहे.
मृत युवकाचे नाव अतिक (२४)असे असून तो घटनास्थळीच ठार झाला. तर आणखी एक युवक गंभीर जखमी झाला असून स्थानिकांनी त्याला तातडीने रुग्णालयात हलवलेअसून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
अपघात होताच दोघे प्रवासी कारमधून उडी मारून बचावल्याची माहिती समोर आली आहे. कारमधील सर्वजण बैलहोंगल शहरातील असल्याची माहिती मिळावी असून अधिक तपास सुरु आहे. घटनास्थळी बैलहोंगल सीपीआय प्रमोद एलिगार, एएसआय मल्लन्नावरआणि पोलीस कर्मचारी उपस्थित राहून पंचनामा केला.हा अपघात पोलीस ठाण्याच्या हद्दीत* घडला आहे


