बेळगाव लाईव्ह : खानापूर-नंदगड मार्गावर दोन ट्रक एकमेकात आदळल्याने झालेल्या अपघातात ट्रकचालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
मंगळवार 7 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री सुमारे 11 वाजता सुमारास खानापूर-नंदगड मुख्य रस्त्यावर नावगा क्रॉसजवळ दोन लारी (ट्रक) यांचा भीषण अपघात झाला होता. अपघाता होताच लारीचा चालक अडकून पडला होता.
घटनेची माहिती मिळताच नंदगड 108 रुग्णवाहिका पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत अथक प्रयत्न करून चालकाला बाहेर काढून प्राथमिक उपचार दिले.
त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी खानापूर सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर अधिक उपचारासाठी बेळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.




