बेळगाव लाईव्ह :बेळगाव तालुक्यातील सुळेभावी गावात अल्पवयीन मुलाकडून दागिन्यांची चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला असून पोलिसांकडून चोरीचा उलगडा करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 11ऑक्टोबर रोजी दुपारी 3:00 वाजता फिर्यादीनी मारीहाळ पोलीस ठाण्यात दागिने तक्रार दाखल केली होती. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:00 ते सायंकाळी 6:00 या दरम्यान बेळगाव तालुक्यातील सुळेभावी गावातील बाजार गल्लीमध्ये असलेल्या त्यांच्या घराच्या बेडरूममधील ट्रेझरीत ठेवलेले सोनेरी दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले.एकूण 61 ग्रॅम वजनाचे सुमारे ₹3,66,000 किमतीचे दागिने चोरीला गेले. या प्रकरणी मारीहाळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 121/2025, कलम 305(ए), 331(1)(3) बीएनएस अंतर्गत नोंद करण्यात आला आहे.
प्रकरणातील चोरीचा माल व आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेचे पीएसआय आणि त्यांच्या सहकाऱ्यांची टीम तयार करण्यात आली. तपासादरम्यान, 12/10/2025 रोजी सकाळी 9:00 वाजता सुळेभावी–खनगाव रस्त्यावरील कलेश्वर मंदिराजवळ पोलिसांना एक संशयास्पद तरुण दिसला.
त्याला अडवून चौकशी केल्यावर त्याने कबूल केले की, 10/10/2025 रोजी दुपारी 3:00 च्या सुमारास आपल्या नातेवाईकांच्या घरात शिरून त्यांनी ठेवलेले सोने चोरी केले.सदर आरोपी हा अल्पवयीन असल्याचे समोर आले असून, त्याच्याकडून चोरीचे सुमारे रुपये 3,66,000 किमतीचे 61 ग्रॅम वजनाचे सोनेरी दागिने जप्त करण्यात आले आहेत.
या कारवाईत पोलिस आयुक्त, डीसीपी (गुन्हे व वाहतूक), एसीपी बेळगाव ग्रामीण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय आय. आर. पट्टणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सीपीएसआय चंद्रशेखर तसेच कर्मचारी बी. बी. कड्डी, हनमंत यरगुडी, चन्नप्पा हुन्च्याळ, आर. एच. तळवार, आर. एस. बलुंदगी आणि टी. जी. सुळकोड यांनी सहभाग घेतला.
या कारवाईत सहभागी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक पोलीस आयुक्त बेळगाव भूषण बोरसे यांनी केले आहे.





