शेळकेंवर लादलेल्या 5 लाखांच्या दंडात्मक व प्रतिबंधात्मक कारवाईला स्थगिती

0
15
 belgaum

बेळगाव लाईव्ह :१ नोव्हेंबर काळ्या दिनाच्या पार्श्वभूमीवर मराठी भाषिकांवर दडपशाही म्हणून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर,सरचिटणीस मालोजी अष्टेकर,खजिनदार प्रकाश मरगाळे यांना प्रतिबंधात्मक ५ लाखांची दंडात्मक नोटीस

तर महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष,युवा नेते शुभम शेळके यांना ५ लाखांचा दंड ठोठावण्याचा आदेश कायदा व सुव्यवस्था विभागाच्या आयुक्तांनी दिला होता, पोलीस प्रशासनाच्या या कारभारा विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीचे वकील महेश बिर्जे यांनी जिल्हा अतिरिक्त न्यायालयात काल दिनांक ३० ऑक्टोबर रोजी आव्हान दिले होते.

, आज द ३१ ऑक्टोबर रोजी बेळगाव जिल्हा 6व्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने स्थगिती दिली असून मराठी भाषिकांना येनकेन प्रकारे विविध गुन्ह्यात अडकवनाऱ्या व वरचेवर तोंडघशी पडणाऱ्या पोलीस प्रशासनाला ही पुन्हा एक चपराक मानली जात आहे.

 belgaum

मराठी माणसाला जाणीवपूर्वक त्रास देऊन आर्थिक भुर्दंडात अडकवण्याचा पोलीस प्रशासनाचा हा डाव यामुळे देखील वकील महेश बिर्जे,बाळासाहेब कागणकर,एम.बी.बोन्द्रे,वैभव कुट्रे,अश्वजित चौधरी यांनी हाणून पाडला आहे.

न्यायालयाने दिलेल्या या स्थगिती आदेशामुळे लोकशाही मार्गाने आपला लढा लढणाऱ्या मराठी माणसाला एक दिवस सीमाप्रश्नीही न्याय मिळणार यात काही शंका नाही.

यावेळी सरचिटणीस मनोहर हुंदरे,युवा समिती सीमाभागचे उपाध्यक्ष दिनेश मुधाळे, हरिरंग बिरादार,परशुराम मरडे व इतर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.