बेळगाव लाईव्ह : वाल्मिकी समाजाबद्दल माजी खासदार रमेश कत्ती यांनी केलेले अपमानजनक विधान सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. अशा असंवेदनशील वक्तव्यांमुळे समाजातील सुसंवाद आणि संवैधानिक मूल्यांना गंभीर धोका निर्माण झाला झाल्याने त्यांच्यावर कायद्यानुसार चौकशी करुन त्वरित योग्य कारवाई करावी, असे पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी हुक्केरीत पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीनंतर माजी खासदार कत्ती यांनी वाल्मिकी समाजाबावत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रारही करण्यात आली आहे.
याशिवाय जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलने करण्यात येत आहे. यावर पालकमंत्री जारकिहोळी व्यक्त झाले आहेत.
ते म्हणाले, जातीचे विष नष्ट करण्यासाठी आपले जीवन समर्पित करणारे बुद्ध, बसव आणि डॉ. आंबेडकर हे आपला मार्ग आणि समानता, मानवता आणि बंधुत्वाचा मार्ग असले पाहिजेत, असे सांगतात.
पण काहीजण मी मोठा, तुम्ही मोठे अशा पद्धतीने जातीचे विष पेरत आहेत. त्यामुळे, कत्ती यांच्याबाबत चौकशी करून कायदेशीर कारवाई झाली पाहिजेत. संपूर्ण जिल्हा आणि राज्याचा दौरा करुन विकासकामांना प्राधान्य दिले जाईल. दिवाळीनंतर कत्ती यांनी केलेल्या वैयक्तिक टीकेवर निर्णय घेण्यात येईल, असेही पालकमंत्री जारकिहोळींनी सांगितले.




