डीसीसी बँक निवडणुकीसाठी रमेश कत्तींचे मोठे शक्तिप्रदर्शन

0
2
 belgaum

बेळगाव लाईव्ह : हुक्केरी मतदारसंघातून डीसीसी बँकेच्या संचालकपदासाठी अर्ज दाखल करणारे माजी खासदार रमेश कत्ती यांनी आज पुन्हा एकदा आपल्या ५२ पीकेपीएस मतदारांना सोबत घेऊन नामनिर्देशन पत्र दाखल करत मोठे शक्तिप्रदर्शन केले.

बुधवारी शहरातील डीसीसी बँकेच्या मध्यवर्ती कार्यालयात दाखल झालेल्या कत्ती यांनी आपल्यासोबत असलेल्या ५२ समर्थक मतदारांसह अर्ज दाखल करून आपली ताकद दाखवून दिली. विशेष म्हणजे, कालच आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी हुक्केरी मतदारसंघातील ४२ मतदारांच्या पाठिंब्याने राजेंद्र पाटील यांना आपला उमेदवार म्हणून घोषित केले होते.

यावेळी पत्रकारांशी बोलताना कत्ती म्हणाले, “माझ्या पाठिशी असलेल्या ५२ सदस्यांना सोबत घेऊन मी दुसऱ्या फेरीत उमेदवारी अर्ज भरला आहे. डीसीसी बँकेचे मध्यवर्ती कार्यालय पाहण्याची इच्छा असलेल्या मतदारांनाही मी सोबत आणले आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

 belgaum

जिल्ह्यातील कोणत्याही मतदारसंघाचे नेतृत्व मी करणार नाही. त्या-त्या तालुक्यांतील नेत्यांनी विचारविनिमय करून जो निर्णय घेतला असेल, त्या निर्णयासोबत मी उभा राहीन. “समविचारी लोकांनी एकत्र येऊन हातमिळवणी केल्यास बँकेच्या हितासाठीच मी पुढे वाटचाल करीन,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.