बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेने जय किसान होलसेल व्हेजिटेबल मर्चंट्स असोसिएशनला 25 सप्टेंबर रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे त्याअंतर्गत मार्केटच्या जमिनीवर देण्यात आलेले व्यावसायिक बांधकाम परवाने आणि बांधकाम पूर्णत्व प्रमाणपत्रे रद्द का करू नयेत, अशी विचारणा केली आहे त्या नोटीसची अवधी उद्या संपणार असून जय किसान कडून काय उत्तर दिले जाते याकडे लक्ष लागले आहे.
शासनाच्या आदेशातील शर्तींचे उल्लंघन झाल्याने भू-वापराचा मूळ आदेशच स्वयं-रद्द झाल्याचे निश्चित झाल्यामुळे महापालिकेने ही कठोर कारवाई सुरू केली असून नोटीस बजावली होती.
महापालिकेकडून जय किसानला 25 सप्टेंबर रोजी देण्यात आला नोटीस मध्ये काय म्हणण्यात आले आहे ते वाचूयात
जय किसान मार्केट ज्या जमिनीवर उभे आहे, त्या १० एकर २० गुंठे जमिनीचा भू-वापर कृषी क्षेत्रातून व्यावसायिक क्षेत्रात बदलण्याचा शासनाचा दिनांक ११-१२-२०१४ चा आदेश होता. या आदेशातील शर्त क्रमांक ०७ चे उल्लंघन झाल्याचे निश्चित झाले आहे.
परिणामी, भू-वापर बदलाचा तो आदेश आपोआप रद्द झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे, महानगरपालिका अधिनियम, १९७६ च्या कलम ४४३ (४) नुसार बांधकाम परवाने रद्द करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
ही जमीन महायोजनेत कृषी उद्देशासाठी आरक्षित असतानाही, तिचा वापर व्यावसायिक कारणांसाठी करण्यात आला होता. परंतु, तो भू-वापर बदलाचा आदेशच रद्द झाल्याचे निश्चित झाले आहे. या कारणास्तव, जय किसान होलसेल व्हेजिटेबल मर्चंट्स असोसिएशनला ही नोटीस मिळाल्यापासून १४ दिवसांच्या आत आपले लेखी म्हणणे महापालिका कार्यालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्या 14 दिवसाचा अवधी उद्या संपणार असून जय किसान कडून मनपाला कोणते उत्तर देण्यात येते याकडे लक्ष लागून राहिले आहे.
जर जय किसान कडून मुदतीत म्हणणे सादर न केल्यास, आपले काहीही म्हणणे नाही असे मानले जाईल आणि नियमानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा नोटिसीच्या माध्यमातून देण्यात आला आहे त्यामुळे कोणते उत्तर देण्यात येते याकडे लक्ष लागले आहे.


