बेळगाव लाईव्ह :कर्नाटक रक्षणा वेदिके बेळगाव जिल्हा शाखेतर्फे उद्या रविवार दि 12 ऑक्टोबर 2025 रोजी आयोजित कन्नड दीक्षा प्रतिज्ञा स्वीकार समारंभाच्या अनुषंगाने पोलीस आयुक्तांच्या आदेशावरून पार्किंगसंदर्भात सूचना करण्यात आली आहे.
कर्नाटक रक्षणा वेदिके बेळगाव जिल्हा शाखेतर्फे उद्या रविवारी कॉलेज रोडवरील गांधीभवन येथे कन्नड दीक्षा प्रतिज्ञा स्वीकार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
या समारंभासाठी येणाऱ्या वेदिकेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह हितचिंतकांच्या वाहनांमुळे संबंधित परिसरात वाहनांची गर्दी होणार आहे. परिणामी पार्किंगची समस्या उद्भवून रहदारीस अडथळा निर्माण होऊ शकतो.
ही बाब ध्यानात घेऊन सदर समारंभासाठी येणाऱ्यांनी आपली वाहने गांधीभवन परिसरात अथवा तेथील रस्त्यांवर पार्क न करता ती क्लब रोडवरील सीपीएड कॉलेज मैदानावर पार्क करावीत, अशी सूचना बेळगाव शहर पोलीस आयुक्तांनी केली आहे.



