बेळगाव लाईव्ह : कर्नाटक रक्षण वेदीकेचे अध्यक्ष नारायण गौडा याची पुन्हा एकदा जीभ पून्हा एकदा घसरली असून त्याने महाराष्ट्र एकीकरण समिती विरोधात वादग्रस्त प्रक्षोभक वक्तव्य केले आहे.
“*काळा दिन पाळणाऱ्या विरोधात तुम्ही गप्प बसू नका, तुरुंगात गेला तरी चालेल मी सोडून आणतो काळ्या दिनाचे समर्थन करणाऱ्यांना सोडू नका*” असे चिथावणीखोर वक्तव्य करत आपला कडू शमवून घेतला आहे.
रविवारी बेळगावच्या गांधी भवनात कर्नाटक रक्षण वेदिकेच्या वतीने ‘कन्नड दीक्षा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भूमी आणि भाषेच्या संरक्षणासाठी ‘कन्नड दीक्षा’ देण्यात आली त्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
समितीच्या लोकांनी मराठी महाराष्ट्रात ठेवावी. कन्नडिग म्हणून इथे राहायचे असेल तर राहा. अन्यथा, आम्ही मोफत बस आणि ट्रेन देऊ. गाठोडे बांधा आणि निघून जा. ‘१ नोव्हेंबरला ‘काळ्या दिवसा’साठी परवानगी दिल्यास संपूर्ण बेळगाव त्या दिवशी रणभूमी बनेल, अशी दरपोक्ती त्यांनी यावेळी केली आहे.
एकीकडे कर्नाटक उच्च न्यायालयाने लोकशाही मार्गातून लढणाऱ्या मराठी भाषिकांना आंदोलन करण्यापासून कोणी अडवू शकत नाही असा निर्वाळा दिला असताना नारायण गौडाच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला जात आहे.
यावेळी बोलताना हुक्केरी हिरेमठाचे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजींनी ‘सर्वांनी प्रथम दीक्षा घेतली पाहिजे. ‘तुम्ही कोण?’ असे विचारल्यास, ‘मी सर्वप्रथम कन्नडिग आहे’ अशी भावना प्रत्येकात असायला हवी,’ असे त्यांनी सांगितले.
यावेळी क.र.वे.चे राज्य संघटक सुरेश गवण्णवर, जिल्हाध्यक्ष दीपक गुडगनट्टी यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.


