बेळगाव लाईव्ह :मिशन ऑलिंपिक गेम्स असोसिएशन, कर्नाटक राज्य यांच्यातर्फे बेळगावमध्ये येत्या शनिवार दि. 25 आणि रविवार दि. 26 ऑक्टोबर 2025 रोजी विविध गटातील मिशन ऑलिंपिक अखिल भारतीय कुस्ती स्पर्धा -2025 चे आयोजन करण्यात आले आहे.
मिशन ऑलिंपिक गेम्स असोसिएशन, कर्नाटक राज्य ही संघटना इंटरनॅशनल ऑलिंपिक गेम्स ऑर्गनायझेशन कमिटीशी संलग्न आहे. त्यांनी आयोजित केलेली उपरोक्त मॅटवरील कुस्ती स्पर्धा भाग्यनगर, अनगोळ, बेळगाव येथील रामनाथ मंगल कार्यालय येथे होणार आहे.
ही स्पर्धा 14 वर्षाखालील, 17 वर्षाखालील, 19 खालील आणि वरिष्ठ गट (पुरुष व महिला) अशा एकूण चार विभागात होणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून उझबेकिस्थान येथे येत्या 23 ते 28 नोव्हेंबर 2025 या कालावधीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा -2025 साठी पैलवानांची निवड केली जाणार आहे.
तरी मिशन ऑलिंपिक अखिल भारतीय कुस्ती स्पर्धेसंदर्भात अधिक माहितीसाठी इच्छुकांनी मिशन ऑलिंपिक गेम्स असोसिएशन कर्नाटकचे अध्यक्ष पैलवान अतुल शिरोळे (8861169217) दुंडेश मिडकट्टी 7259269812), महेश गुंजीकर (8197621730), गंगाधर एम. (9845857230), भावेश बिर्जे (9242349737), चेतन देसाई (9448154818), मनोज बिर्जे (9901 593773) अथवा अमर निलजीकर (8884096383) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ऑनलाइन नोंदणी येत्या दि. 18 ऑक्टोबर 2025 पर्यंत सुरू राहणार आहे. नोंदणी फॉर्म स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्यांना फोनपे / गुगल पे द्वारे 8861169217 या क्रमांकावर 1000 रुपयांचे ऑनलाइन प्रवेश शुल्क भरावे लागेल. प्रवेश शुल्क भरल्याशिवाय, नोंदणी वैध मानली जाणार नाही. जर प्रवेश शुल्क भरले नाही तर तुमची नोंदणी स्वीकारली जाणार नाही, असे कळविण्यात आले आहे.



