बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्हा मध्यवर्ती अर्थात डीसीसी बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीसाठी रविवारी झालेल्या मतदानाचा बेळगाव शहरातील बी.के.मॉडेल येथील मतमोजणी केंद्रावर मतमोजणी पार पडली.
बेळगाव जिल्हा मध्यवर्ती निवडणुकीत मतदानाचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये निपाणी तालुक्यातून माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी विजय मिळवला आहे. बेळगाव जिल्ह्यातील निपाणी मधील ही लढत चर्चेची बनली होती अखेर माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी बाजी मारली असून य
त्यांना 71 मते तर उत्तम पाटील यांना केवळ 55 मतावर समाधान मानावे लागले आहे.
रामदुर्ग मधून मल्लांना यादवाड यांना 35 मते मिळाली विजयी झालेले आहेत तर रायबाग तालुक्यामध्ये आप्पासाहेब कुलगोडे यांना 120 मते पडली असून ते विजयी झाले आहेत.

अथणी तालुक्यात लक्ष्मण सवदी यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला असून त्यांना 120 मध्ये पडली आहेत.
बहुचर्चित हुक्केरी तालुक्यामधून माजी खासदार रमेश कत्ती यांना 59 मते पडली असून ते विजयी झाले तर त्यांच्या विरोधातील उमेदवार राजेंद्र पाटील यांना केवळ 30 मते मिळाली आहेत.
बैलहोंगल तालुक्यामधील निवडणुकीत महांतेश दौडगौडर यांना 53 मते पडली आहेत ते विजयी झाले तर व्हि आय पाटील यांना 20 मते मिळाली आहेत.
कित्तूर मधून अण्णासाहेब पाटील आणि विक्रम इनामदार या दोघांनाही 15 अशी समान मते पडली आहेत त्यामुळे या निकालाचा निर्णय टॉस वर होण्याची शक्यता आहे.











