Saturday, December 6, 2025

/

जारकीहोळी समर्थकांचे बिनविरोध विजयात वर्चस्व

 belgaum

बेळगाव लाईव्ह : राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुन्हा एकदा जारकीहोळी बंधूंच्या राजकीय ताकदीचा अचूक दर्शक ठरली आहे. संचालक मंडळाच्या १६ पैकी तब्बल ६ जागांवर जारकीहोळी समर्थकांची अर्ज छाननीपूर्वीच बिनविरोध निवड झाल्याने, हे केवळ सहकारी निवडणूक नव्हे तर राजकीय मुसंडीचं स्पष्ट संकेत देणारे समीकरण ठरत आहे.

जारकीहोळी गटाने सहा जागा बिनविरोधपणे जिंकून, आपली डीसीसी बँकेवरील पकड पुन्हा मजबूत केली आहे. या निवडीमध्ये बेळगावमधून राहुल जारकीहोळी, गोकाकमधून माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांचे पुत्र अमरनाथ जारकीहोळी,

यरगट्टीतून आमदार विश्वास वैद्य, मुडलगीतून नीळकंठ कप्पलगुद्दी, आणि सवदत्तीतून विरुपाक्ष मामनी यांचा समावेश आहे. याशिवाय गटविरहित असणारे चिक्कोडीचे आमदार गणेश हुक्केरी यांचीही बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.

 belgaum

डीसीसी बँक निवडणुका या स्थानिक नेत्यांसाठी केवळ आर्थिक संस्था नव्हे, तर राजकीय ताकद सिद्ध करणाऱ्या व्यासपीठासारख्या असतात. त्यामुळे सहा जागांवर अर्ज मागे घेण्याची वेळ येण्याआधीच झालेला हा विजय,

जारकीहोळी बंधूंच्या स्थानिक राजकारणातील प्रभावाचं प्रमाणपत्र मानला जात आहे. १२ ऑक्टोबरला अर्ज छाननी, तर १३ तारखेला अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असून, उर्वरित १० जागांसाठी खऱ्या लढतीचं चित्र स्पष्ट होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.