बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि कदंबकालीन राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेल्या हलशी (ता. खानापूर) येथे आज, मंगळवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त भव्य रथोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
हलशी हे ऐतिहासिक पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. संपूर्ण कर्नाटकातच नव्हे तर देशभरात पर्यटन क्षेत्र म्हणून ओळखले जाते.
सायंकाळी रथोत्सवाची सुरुवात होणार असून, या पारंपरिक सोहळ्यासाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने हलशी येथे दाखल होणार आहेत. मंदिरे सजविण्यात आली असून, गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कदंब राजवटीच्या काळापासून सुरू असलेला हा रथोत्सव हलशीच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक मानला जातो. या निमित्ताने विविध धार्मिक विधी, पूजा-अर्चा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.




