बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहर पोलीस आयुक्त कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, 28 ऑक्टोबर 2025 रोजी शहरातील विविध पोलीस ठाण्यांनी मटका आणि गांजा सेवनाविरोधात संयुक्त कारवाई केली पोलिसांनी एकूण 5 प्रकरणांमध्ये 8 आरोपींना अटक करण्यात आली असून, मटका खेळ आणि गांजा सेवन यांसारख्या गुन्ह्यांवर प्रभावी कारवाई करण्यात आली आहे.
मार्केट पोलीस ठाण्याची कारवाई
मार्केट पोलीस ठाण्याचे PSI विठल हावण्णावर व पथकाने खंजर गल्ली, मोडल हॉटेलजवळ मटका खेळणाऱ्यांवर छापा मारला.
अटक केलेले आरोपी — यब्ब मुख़्तार इनामदार (26, माळी गल्ली, बेळगाव),फहीम जलानी कोतवाल, गल्ली बेळगाव) त्यांच्याकडून ₹3,280 रोख रक्कम आणि मटका नंबरची चिठ्ठी जप्त करण्यात आली.
मारीहाळ पोलीस ठाण्याची कारवाई
मारीहाळ पोलीस PSI चंद्रशेखर सी. व त्यांच्या पथकाने बागलकोट रोडलगत संशयास्पद हालचाल करणाऱ्या एका व्यक्तीस चौकशीसाठी ताब्यात घेतले.अटक आरोपी —
ओंकार मारुती बिर्जे (26, सिद्देश्वर गल्ली, मोदगा– बेळगाव ,तपासात त्याने गांजा सेवन केल्याचे स्पष्ट झाल्याने त्याच्यावर NDPS कायदा कलम 27(b) अंतर्गत प्रकरण क्र. 133/2025 नोंदविण्यात आले.
– APMC पोलीस ठाण्याची कारवाई
APMC पोलीस ASI एम. ए. पाटील व पथकाने वैभव नगर, ओ शावा हॉटेलजवळ गांजा सेवन करणाऱ्या तिघांना पकडले.
अटक आरोपी —
1️⃣ शानूर मेहमूद संशी (28, वैभव नगर, बेळगाव)
2️⃣ शहीद आसिफ शेख (25, वैभव नगर)
3️⃣ जाफरसादिक मेहमूद संशी (30, वैभव नगर)
प्रकरण क्र. 142/2025, कलम 27(b) NDPS Act अंतर्गत नोंदविण्यात आले आहे.
काकती पोलीस ठाण्याच्या दोन स्वतंत्र कारवाया
काकती पोलीस PSI एम. एस. मठद व त्यांच्या पथकाने दोन ठिकाणी छापे टाकून दोन व्यक्तींना अटक केली.
1️⃣ रोहित केदार कोचरी (25, देसाई गल्ली, काकती) — मुत्यानट्टी ब्रिजजवळ गांजा सेवन करताना अटक.
प्रकरण क्र. 224/2025, NDPS कलम 27(b).
2️⃣ आर्य संजय कांबळे (20, लक्ष्मी गल्ली, काकती) — काकती इंडस्ट्रियल एरियाजवळ अटक.
प्रकरण क्र. 225/2025, NDPS कलम 27(b).



