belgaum

विविध गुन्हेगारी कारवायांवर कारवाई – 18 आरोपी ताब्यात

0
77
Cop bgm
 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव ग्रामीण, कॅम्प, एपीएमसी, हिरेबागेवाडी आणि मार्केट पोलिस ठाण्यांच्या पथकांनी एकाच दिवशी गांजा विक्री, सेवन, अवैध दारू विक्री आणि जुगार प्रकरणांवर धाडी घालून 18 आरोपींना अटक केली आहे.

बेळगाव ग्रामीण पोलिसांची कारवाई : गांजा विक्री व सेवन प्रकरणेदिनांक 27/10/2025 रोजी जय नगर, हुंचनट्टी परिसरात राहुल बसवराज सुतार (23) आणि परशुराम यल्लप्पा बुगडिकट्टी (24) हे गांजा विक्री करत असताना पोलिसांनी छापा मारून 1016 ग्रॅम गांजा (किंमत ₹33,300), मोटरसायकल (₹85,000), वजनकाटा, मोबाईलसह एकूण ₹1,22,000 किमतीचा मुद्देमाल जप्त केला.


दोघांवर NDPS कायद्याच्या कलम 20(b)(ii)(B) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
याच दिवशी हावळनगर, मच्छे आणि झाडशाहपूर भागात आकाश मधुकर गावकर (25), एस.जी. पडेकर (21) आणि रोहित बसू मोदगेकर (22) हे तिघेही सार्वजनिक ठिकाणी अंमली पदार्थांचे सेवन करून विचित्र वर्तन करत असल्याचे आढळले. पोलिसांनी त्यांना वैद्यकीय तपासणीस पाठवून NDPS कायद्याच्या कलम 27(b) अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.

कॅम्प पोलिसांची कारवाई : गांजा सेवन करणारे तिघे अटकदिनांक 27/10/2025 रोजी सेंट पॉल स्कूलजवळ आनंद मारुती नायक (26), संदेश किरण जाधव (26) आणि अभिजीत भरमा पाटील (22) हे गांजा सेवन करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर कॅम्प पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. NDPS कायद्याच्या कलम 27(b) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

एपीएमसी पोलिसांची कारवाई : दोन आरोपी अटकज्योतीनगर परिसरात विलास शंकर बाळेकुंद्री (32) आणि हिमांशू गोविंदराम आर्या (34, उत्तराखंड) हे अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावर NDPS कायद्याच्या कलम 27(b) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हिरेबागेवाडी पोलिसांची कारवाई : अवैध दारू विक्रीवर धाड

फातिमा दरगाह परिसरात परशुराम माणिक हणमंताचे (37) हा व्यक्ती अवैध दारू विक्री करत असताना पकडला गेला. पोलिसांनी DK Double Kick कंपनीच्या 30 टेट्रा पॅक व्हिस्की (₹1,200 किमतीची) जप्त करून आरोपीवर अबकारी कायदा 1965 अंतर्गत कलम 32, 34 नुसार गुन्हा दाखल केला.

मार्केट पोलिसांची कारवाई : जुगार अड्ड्यावर धाड – सात आरोपी अटकफारुकिया कॉलनीजवळ इस्पीट पत्त्यांवर पैज लावत असताना इरफान मोहम्मद हुसेन कलादगी (36), सईद फारुख इरापूर (19), नियाज अब्दुल्ला गौंडी (32), जाफर मीरासाब सनदी, मोहम्मद शबीर मुल्ला (29), मोहम्मद आसिफ बागवान (25) आणि सद्धाम हुसेन समर मुळ्ला (32) या सात जणांना पोलिसांनी पकडले.


त्यांच्याकडून ₹8,400 रोख व पत्ते जप्त करण्यात आले असून, KP कायद्याच्या कलम 87 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.वरील सर्व नऊ प्रकरणांमध्ये एकूण 18 आरोपींना अटक करण्यात आली असून, संबंधित पोलिस ठाण्यांचे पीआय, पीएसआय आणि पथकांच्या कार्याची पोलिस आयुक्त, बेळगाव शहर व डीसीपींनी प्रशंसा केली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.