बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेनंतर अनेक तालुक्यांमध्ये बिनविरोध निवडीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे.
यरगट्टी तालुक्यातून आमदार विश्वास वैद्य यांनी तर मुडलगितून नीळकंठ कप्पलगुद्दी यांनी अर्ज दाखल केला. या दोन महत्त्वाच्या जागांवर प्रत्येकी एकच नामनिर्देशनपत्र दाखल झाल्याने वैद्य आणि कप्पलगुद्दी यांची बिनविरोध निवड झाली आहे.
नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या, मात्र प्रक्रिया संपताच बँकेच्या आवारात उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. विशेषतः ज्या तालुक्यातून केवळ एकच नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहे.
सडून यावेळी कार्यकर्त्यांनी आतषबाजी करत आनंद व्यक्त केला. या संभाव्य विजयाच्या पार्श्वभूमीवर आमदार विश्वास वैद्य आणि नीळकंठ कप्पलगुद्दी यांच्या समर्थकांनी बेळगाव डीसीसी बँकेसमोर मोठ्या प्रमाणात गर्दी केली. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि घोषणाबाजी करत आपला आनंद साजरा केला.


