belgaum

आरएसएस पथसंचलनासंदर्भात ‘यांनी’ घेतली पोलीस आयुक्तांची भेट

0
119
 belgaum

बेळगाव लाईव्ह :विजयादशमी आणि आरएसएस शताब्दी वर्षानिमित्त रविवार दि. 12 ऑक्टोबर 2025 रोजी होणारे पथ संचलन (रूट मार्च) सुरळीत पार पडण्यासाठी पोलीस प्रशासनाने सहकार्य करावे, अशी विनंती माजी आमदार ॲड. अनिल बेनके यांनी बेळगाव शहर पोलीस आयुक्तांना केली आहे.

विजयादशमी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) शताब्दी वर्षानिमित्त रविवार दि. 12 ऑक्टोबर 2025 रोजी बेळगाव शहरात आरएसएसचे भव्य पथसंचलन काढण्यात येणार आहे.

या पार्श्वभूमीवर माजी आमदार ॲड. अनिल बेनके आणि आरएसएसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आज शुक्रवारी पोलीस आयुक्तालयामध्ये शहर पोलिस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांची भेट घेतली.

 belgaum

सदर भेटीप्रसंगी रविवारी होणाऱ्या पथसंचलना बाबतची माहिती माजी आमदार बेनके यांनी पोलीस आयुक्तांना दिली. तसेच पथसंंचलन कार्यक्रमादरम्यान कोणतीही अनुचित अप्रिय घटना घडू नये यासाठी कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना हाती घ्याव्यात अशी विनंती केली.

सदर विनंती मान्य करून पोलीस आयुक्त बोरसे यांनी रविवारी होणाऱ्या पथसंचलनादरम्यान चोख पोलीस बंदोबस्त ठेवला जाईल. तसेच पथसंचलन शांततेने सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाचे सर्वतोपरी सहकार्य असेल, असे आश्वासन दिले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.