बेळगाव लाईव्ह: एसटी(अनुसूचित जमाती) समाजाबद्दल अश्लील शब्द वापरून अवमान केल्याचा आरोप माजी खासदार रमेश कत्ती यांच्यावर करण्यात आला असून, त्यांच्याविरुद्ध जातीय अवमान प्रकरण दाखल करण्यात आले आहे.
बेळगाव शहरात रविवारी डीसीसी बँकेच्या संचालक पदासाठी मतदान होत असताना आपल्या समर्थकांशी बोलताना रमेश कत्ती यांनी एसटी समाजाबद्दल अवाच्य शब्द वापरल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या संदर्भातील व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर आणि माध्यमांमध्ये प्रसारित झाल्यानंतर, त्या आधारे एसटी समाजाचे नेते राजशेखर तळवार यांनी कॅम्प पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
या प्रकरणी रमेश कत्ती यांच्या विरोधात कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



