बेळगाव लाईव्ह : पिण्याच्या पाण्याचा पुरवठा योजनेसाठी संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदल्याचा चेक देण्यासाठी 1 लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी नगर पाणीपुरवठा व सांडपाणी महामंडळाच्या कार्यकारी अभियंत्याला अटक करण्यात आली आहे.
रायबाग तालुक्यातील खेमलापूर गावातील यासिन पेंधारी यांच्या 14 गुंठे जमिनीचे मुगळखोड आणि हारुगेरी शहरांसाठी ‘अमृत’ योजनेअंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा योजनेसाठी जमीन संपादित करण्यात आली होते. या संपादित जमिनीबाबत शासनाकडून मंजूर झालेल्या 18 लाख रुपयांच्या अनुदानाचा चेक मंजूर करून देण्यासाठी 1 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप बेळगाव विभागातील नगर पाणीपुरवठा सांडपाणी मंडळाचे कार्यकारी अभियंता अशोक शिरूर यांच्यावर करण्यात आला आहे.
या संदर्भात कर्नाटक लोकायुक्त पोलीस ठाणे, बेळगाव येथे दिनांक 17-10-2025 रोजी प्रकरण क्रमांक 16/2025 अंतर्गत भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम 7(a) नुसार पीआय निरंजन पाटील यांनी तक्रार दाखल करून तपास सुरू केला होता.

हनमंतराय, पोलिस अधीक्षक, लोकायुक्त, बेळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी 27-10-2025 रोजी तपास अधिकारी निरंजन पाटील व त्यांच्या पथकाने आरोपी अधिकारी अशोक शिरूर (कार्यकारी अभियंता, नगर पाणीपुरवठा सांडपाणी विभाग) यांना त्यांच्या कार्यालयात अटक केली.
या तपास मोहिमेत सहाय्यक म्हणून गोविंदगौडा पाटील (PI) तसेच कर्मचारी रवी मावरकर, गिरीश, शशिधर, सुरेश आणि मल्लिकार्जुन थैकर यांनीही सहभाग नोंदवला होता.




