belgaum

उत्पन्न आहे, पण नियोजन नाही! मराठा तरुणांनी काय करावं

0
64
 belgaum

जागा हो मराठा! शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि जीवनशैलीतील आव्हानांवर विशेष लेखमालिका

जग वेगाने बदलत आहे. एकेकाळी १०० टक्के शेतीवर अवलंबून असणारा मराठा समाज आता आपला मोर्चा मोठ्या प्रमाणात व्यवसाय, नोकरी आणि इतर क्षेत्रांकडे वळवत आहे. विविध क्षेत्रांत आपले पाय रोवू पाहत असताना, नव्या क्षेत्रात प्रवेश करताना अनेक समस्या उभ्या राहतात. दुर्दैवाने, बेळगावच्या मराठा समाजालाही अशा अनेक समस्यांनी ग्रासले आहे आणि समाजाची प्रगती काही प्रमाणात खुंटल्याचे दिसत आहे. बेळगावच्या मराठा समाजाची अधोगतीकडे होणारी वाटचाल, याला नेमके कोण जबाबदार आहे? समाजासमोरच्या नेमक्या समस्या काय आहेत? या समाजाला पुन्हा प्रगतीपथावर नेण्यासाठी काय करणे गरजेचे आहे? या प्रश्नांचा वेध घेणे आज अत्यंत आवश्यक आहे.

‘जागा हो मराठा’ या विशेष लेखमालेतून आम्ही बेळगावच्या मराठा समाजाला भेडसावणाऱ्या या सर्व समस्यांवर प्रकाश टाकून, प्रगतीपथावर जाण्यासाठीचे ठोस उपाय आणि कृतीची दिशा देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष 4 : बेळगावच्या मराठा समाजामध्ये शिक्षणाचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला आहे. समाजातील मुले आता इंजिनियर, डॉक्टर बनत असून विविध उच्च शिक्षण घेत आहेत आणि आपापल्या क्षेत्रात तरबेज झाली आहेत. नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने शहरांमध्ये गेलेल्या या उच्चशिक्षित घटकांनी पैशाची उपलब्धता बऱ्यापैकी केलेली आहे. त्यांच्या जीवनशैलीत निश्चितच सुधारणा दिसत आहे. परंतु त्याचबरोबर, समाजात एक मोठा गट असा आहे, जो आजही गवंडी काम, फरशी फिटिंग किंवा शेतमजूर अशा श्रमावर आधारित कामांवर, म्हणजे दररोजच्या मजुरीवर आपला उदरनिर्वाह चालवत असतो.

याशिवाय, मराठा समाजात शेतीवर अवलंबून असणारा एक महत्त्वाचा वर्ग आहे. शेतीचे उत्पन्न दररोजचे नसते. ते पूर्णपणे हंगामी पिकांवर अवलंबून असल्यामुळे यातूनही कायम खात्रीशीर उत्पन्न मिळेलच, असे नाही. या नैसर्गिक अनिश्चिततेमुळे शेतीमधून अपेक्षित आर्थिक स्थिरता मिळत नाही. याचबरोबर, अतिवृष्टी किंवा दुष्काळ अशा नैसर्गिक संकटांचा सामना शेतकऱ्यांना अनेक वेळा करावा लागतो. यामुळे त्यांचे संपूर्ण आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडते. पेरणीपासून ते काढणीपर्यंत, उत्पादन हातात येईपर्यंत उत्पादनासाठी केलेला खर्च हा मोठ्या प्रमाणात असतो. जोपर्यंत उत्पादनाचा पैसा हातात येत नाही, तोपर्यंत दररोजच्या खर्चासाठी कर्जबाजारीपणा वाढतो. कुटुंबांना मोठा धोका निर्माण करणारी ही समस्या त्वरित टाळणे अत्यंत आवश्यक आहे.

या गंभीर परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी, प्रत्येक कुटुंबात पैशाच्या व्यवस्थापनाची एक शिस्तबद्ध पद्धत रुजवली पाहिजे. उत्पन्नाचे स्वरूप पाहून आर्थिक नियोजनाची दुहेरी व्यवस्था लागू करणे गरजेचे आहे. दररोज लागणाऱ्या दैनंदिन खर्चासाठी एक स्वतंत्र लहान आर्थिक नियोजन असायला हवे. हे नियोजन कुटुंबाचा दैनंदिन गाडा व्यवस्थित चालवण्यासाठी पुरेसे असावे. त्याचबरोबर, एकदम मोठ्या प्रमाणात हातात येणाऱ्या उत्पन्नासाठी दुसरे मोठे आणि दीर्घकाळ चालणारे, गुंतवणुकीवर भर देणारे नियोजन धोरण राबविले पाहिजे. थोडक्यात, ‘जेव्हा पैसा येईल तेव्हा खर्च करू’ ही चुकीची आणि घातक प्रवृत्ती कुटुंबांनी पूर्णपणे सोडून देणे आवश्यक आहे.

पैशाचा अपव्यय आणि आर्थिक संकट दूर करण्यासाठी मराठा समाजाने काही मूलभूत गोष्टी त्वरित अंमलात आणणे गरजेचे आहे. सर्वात आधी, अनावश्यक आणि प्रतिष्ठेपोटी होणाऱ्या दिखाऊ खर्चांना कठोरपणे फाटा दिला पाहिजे. उत्पन्न हातात आल्याबरोबर, त्याचा काही भाग त्वरित बचत खात्यात किंवा सुरक्षित सरकारी योजनांमध्ये जमा करण्याची सवय लावली पाहिजे. केवळ मजुरीवर अवलंबून न राहता, युवकांनी कौशल्य विकास आणि व्यवसाय प्रशिक्षणावर भर देणे महत्त्वाचे आहे.

समाजातील उच्चशिक्षित आणि नोकरदार वर्गाने एकत्र येऊन गरजू तरुणांना लघु उद्योग, व्यवसाय किंवा नवीन कौशल्ये आत्मसात करण्यासाठी मार्गदर्शन आणि योग्य आर्थिक मदतीचा हात पुढे करण्याची गरज आहे. कर्ज काढणे आणि व्यसनाधीनतेतून तरुण पिढीला बाहेर काढण्यासाठी समाजाने प्रबोधन केंद्रे आणि समुपदेशन शिबिरे नियमितपणे आयोजित करावी लागतील.

केवळ शिक्षण आणि श्रम पुरेसे नाहीत, तर त्या श्रमातून आलेल्या पैशाचे योग्य व्यवस्थापन, भविष्याचा विचार आणि अनावश्यक अपव्यय टाळणे हे आजच्या बेळगावच्या मराठा समाजाचे सर्वात मोठे कर्तव्य आहे. हे ठोस नियोजन आणि सामूहिक कृतीची दिशा स्वीकारल्यास, बेरोजगारी आणि आर्थिक अरिष्टावर मात करून हा समाज पुन्हा प्रगतीपथावर आणि आर्थिक स्थैर्याकडे वाटचाल करू शकतो.

zz deep
zz deep
zz deep
zz deep
zz deep
zz deep
zz deep
zz deep
zz deep
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.