सर्वोच्च न्यायालयातील ‘त्या’ घटनेचा निषेध

0
84
 belgaum

बेळगाव लाईव्ह :नवी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात गेल्या सोमवारी एका खटल्याच्या सुनावणी दरम्यान वकिलाकडून सरन्यायाधीशांच्या दिशेने बूट फेकण्याचा जो प्रकार घडला, त्याचा तीव्र निषेध करताना या प्रकरणातील दोषींवर कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जावी, अशी मागणी बेळगाव बार असोसिएशनने राष्ट्रपतींकडे केली आहे.

बेळगाव बार असोसिएशनचे कार्यकारी सदस्य आणि वकिलांनी आज गुरुवारी सकाळी राष्ट्रपतींच्या नावे असलेले उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून ते त्वरित राष्ट्रपती कार्यालयाकडे धाडण्याचे आश्वासन दिले.

नवी दिल्ली येथील न्यायालयीन कामकाजादरम्यान भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या माननीय मुख्य न्यायाधीशांवर वकील राकेश किशोर यांनी बूट फेकून हल्ला करणाऱ्या दुर्दैवी आणि लज्जास्पद घटनेचा बेळगाव बार असोसिएशन तीव्र निषेध करते. वकील राकेश किशोरी यांनी केलेले बेशिस्त आणि अनादारयुक्त गैरवर्तन कायदेशीर व्यवसायातील शिष्टाचार आणि आदर राखण्याचे महत्त्व लक्षात आणून देते.

 belgaum

कायदेशीर समुदायाच्या सर्व सदस्यांनी विशेषतः न्यायव्यवस्थेशी संवाद साधताना व्यावसायिकता आणि नैतिक वर्तनाच्या सर्वोच्च मानकांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. न्यायालयांप्रती गैरवर्तन किंवा अनादराचे कोणतेही कृत्य केवळ संबंधित व्यक्तीवर वाईट परिणाम करत नाही तर संपूर्ण कायदेशीर व्यवसायाची विश्वासार्हता आणि अधिकार देखील कमी करते.

कायदेशीर बंधुत्वाचा मान आणि प्रतिष्ठा राखण्यासाठी व्यावसायिक गैरवर्तनाच्या प्रकरणांमध्ये कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जावी असे बेळगाव बार असोसिएशनचे मत आहे. सर्व वकिलांनी न्यायव्यवस्थेप्रती प्रामाणिकपणा आणि आदराने वागणे आवश्यक आहे. तेंव्हा वकील राकेश किशोर यांच्यावर कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जावी, अशा आशयाचा तपशील राष्ट्रपतींच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे.

नवी दिल्ली येथे गेल्या सोमवारी 6 ऑक्टोबर रोजी सरन्यायाधीशांच्या खंडपीठांसमोरील एका सुनावणी दरम्यान वकील व न्यायमूर्ती यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. यातून वकीलाने रागाच्या भरात न्यायाधीशांवर बूट फेकल्याची दुर्दैवी घटना घडली. सदर निंद्य घटनेची पडसाद देशभरात उमटत असून विविध संस्था, संघ आणि संघटनांतर्फे निषेध नोंदवला जात आहे. त्याचाच भाग म्हणून बेळगाव बार असोसिएशनने आज आपला निषेध नोंदवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.