बेळगाव लाईव्ह : सरकारच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून राष्ट्रीय सणांचा तिरस्कार करणाऱ्या शहरातील इंग्रजी आणि कॉन्व्हेंट शाळांवर कारवाई करावी. तसेच दसरा सणासह हिंदूंच्या अन्य सणांची सुट्टी या शाळांसाठी सक्तीची करावी, अशी मागणी बेळगावच्या श्रीराम सेनेने बेळगाव जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.
श्रीराम सेनेचे उत्तर कर्नाटक राज्याध्यक्ष रवीदादा कोकीतकर यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन आज शुक्रवारी सकाळी जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (सीईओ) सादर करण्यात आले. सीईओंच्या गैरहजेरी त्यांच्यावतीने त्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. निवेदन सादर करतेवेळी कोकीतकर यांच्या समवेत श्रीराम सेनेचे विभागीय अध्यक्ष विठ्ठल गड्डी व कर्नाटक उत्तर प्रांत उपाध्यक्ष विनय अंग्रोळी यांच्यासह अन्य पदाधिकारी व सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदन सादर केल्यानंतर बेळगाव लाईव्हशी बोलताना रविदादा कोकितकर यांनी म्हणाले की, शहरातील बहुतांश इंग्रजी आणि कॉन्व्हेंट शाळा या ख्रिश्चन संस्थांकडून चालविल्या जातात. सरकार दरवर्षी काही दिवसांची दसऱ्याची सुट्टी जाहीर करत असते. तथापि इंग्रजी व कॉन्व्हेंट शाळांकडून सरकारने घालून दिलेल्या चौकटीत या सुट्ट्यांची अंमलबजावणी केली जात नाही.
मुला-मुलींना एक्स्ट्रा क्लासेस, परीक्षा वगैरे या ना त्या कारणास्तव जाणून बुजून शाळेत बोलावले जाते. नेमके सणाच्या काळात या पद्धतीने मुलांना शाळेत अडकून ठेवायचे असा प्रकार अलीकडे सुरू आहे. दसऱ्याच्या सुट्टीमध्ये सर्वाधिक हिंदू सण असतात आणि हे सण मुलांनी मनापासून व्यवस्थित साजरे करू नयेत. हिंदूंच्या भावी पिढीने या सणांचे महत्त्व समजून घेऊ नये, असा ख्रिश्चन संस्थांच्या शैक्षणिक संस्थांचा खटाटोप चाललेला असतो. दुर्दैवाने या खटाटोपाला आपल्या हिंदू समाजातील मुले बळी पडत आहेत.

कांही ख्रिश्चन शैक्षणिक संस्थांमध्ये तर हिंदू मुला -मुलींना रिवाजानुसार कपाळाला गंध अथवा शेंदुराचा टिळा लावणे, हातात पवित्र धागा बांधणे, हातात बांगड्या घालणे वगैरेंसाठी मज्जाव केला जातो. ख्रिश्चन शैक्षणिक संस्थांमधील मुलांना दबावाखाली ठेवण्याचा हा प्रकार ताबडतोब थांबला पाहिजे. शहरातील इंग्रजी व कॉन्व्हेंट शाळांमधील 90 टक्के मुलं ही हिंदुंची आहेत.
सदर शाळांमधील मुलांवर जो दबाव आणला जात आहे त्यामुळे त्याचा प्रतिकूल परिणाम त्या मुलांवर होत आहे. यासाठीच इंग्रजी व कॉन्व्हेंट शाळांमधील मुला -मुलींसाठी दसऱ्याची सुट्टी ही सक्तीची करावी अशी मागणी आम्ही आज जिल्हा पंचायत सीईओंकडे केली आहे, असे रवीदादा कोकितकर यांनी सांगितले.