श्री गणेशोत्सव काळातच काल शुक्रवारी ईद-ए-मिलाद हा मुस्लिम धर्मियांचा सण साजरा झाला. याचे औचित्य साधून छ. शिवाजी महाराज चौक, पिरनवाडी येथील श्री बालगणेश गणेशोत्सव मंडळाने मुस्लिम बांधवांना श्रींच्या आरतीचा मान देऊन हिंदू -मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडविले.
छ. शिवाजी महाराज चौकातील श्री बालगणेश गणेशोत्सव मंडळाच्या मंडपामध्ये काल शुक्रवारी मुस्लिम बांधवांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली. ईद-ए-मिलाद सणाचे औचित्य साधून पार पडलेल्या या कार्यक्रमाद्वारे पिरनवाडी भागातील हिंदू -मुस्लिम बांधवांनी त्यांच्यामधील बंधुभाव, सौहार्द आणि ऐक्याचे दर्शन घडवले.
यावेळी मुस्लिम बांधवांनी आपल्या ईद-ए-मिलाद निमित्त समाजात ऐक्य नांदावे व श्रीगणेशाने सर्वांना सुखी ठेवावे अशी प्रार्थना केली.
याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष अध्यक्ष सागर कडेमणी, नारायण मुचंडीकर, शेखर मुचंडीकर, अभी लाड, काळगे, इमरान मुजावर, मकबूल मुजावर, फैज मुजावर, इमरान पिरजादे, रोशन हुबलीवाले यांच्यासह श्री बाल गणेश गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, गणेश भक्त व मुस्लिम बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.


