बेळगाव लाईव्ह :दरवर्षीप्रमाणे खास दसरोत्सवानिमित्त राकसकोप (ता. जि. बेळगाव) गावातील हौशी युवकांमार्फत येत्या शनिवार दि. 27 सप्टेंबर 2025 रोजी ‘एक दिवस गावासाठी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
राकसकोप गावातील राजा शिवछत्रपती चौकातील समाजभवनामध्ये शनिवारी रात्री 8 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
सदर कार्यक्रमांतर्गत निवृत्त प्राचार्य शामराव नाना पाटील यांचे ‘गावाच्या भवितव्यात युवकांचे योगदान’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. या निमित्ताने गावातील इयत्ता सातवी व दहावीच्या परीक्षेत प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थी -विद्यार्थिनींचा सत्कार केला जाणार आहे.
त्याचप्रमाणे विविध क्षेत्रात आपल्या कार्याची छाप उमटवलेल्या गावातील व्यक्तींच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.
याखेरीस गावातील भजनी मंडळाचे भारुड व हौशी कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी पार पडणार आहेत. तरी राकसकोप गावासह पंचक्रोशीतील नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.



