बेळगाव लाईव्ह : बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष एस एस किवडसन्नवर यांच्या विरोधातील अविश्वास ठराव मतदानाने संमत करण्यात आला आहे त्यामुळे आता आगामी दिवसात बेळगाव बार असोसिएशन अर्थात बेळगाव वकील संघटनेला नवीन प्रभारी अध्यक्ष मिळणार आहे.
बेळगाव बार असोसिएशनच्या अध्यक्षपदाविरुद्ध दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी आणि मतदान घेण्यासाठी शनिवारी विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली होती. ही सभा कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार घेण्यात आली. या बैठकीत ६२९ सदस्यांनी मतदान केले.
शनिवारी सायंकाळी पर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली आणि त्याची मतमोजणी ही करण्यात आली. बेळगाव बार असोसिएशनच्या अध्यक्षांच्या बाजूने १९४ मते पडली तर विरोधात ४२८ सदस्यांनी मतदान केले तर ७ मते बाद ठरविण्यात आली.

कर्नाटक उच्च न्यायालयाने १५ सप्टेंबर २०२५ रोजी दिलेल्या निर्देशानुसार, बेळगाव बार असोसिएशनच्या अध्यक्षांविरुद्ध दाखल केलेल्या अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी ही विशेष बैठक झाली. उच्च न्यायालयाने बार असोसिएशनला तीन दिवसांच्या आत ही बैठक घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शनिवारी न्यू कोर्ट कॉम्प्लेक्समधील ॲडव्होकेट्स समुदाय भवन हॉलमध्ये ही बैठक झाली.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, बार कौन्सिल ऑफ कर्नाटकचे सदस्य ॲड. विनय मांगलेकर आणि ॲड. के. बी. नायक यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण बैठक पार पडली.
वकील सानिकोप यांनी बेळगाव बार असोसिएशनच्या अध्यक्षांवर का अविश्वास ठराव आणू नये याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
यासाठीच आला अविश्वास ठराव
याचिका कर्ते वकील सानिकोप यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार वकिलांनी बेळगाव कोर्ट परिसरात दोन-तीन नकली वकील फिरत होते याची तक्रार बेळगाव बार असोसिएशनच्या अध्यक्षांकडे करण्यात आली होती मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं होतं यावर कोणतीही कारवाई केली नव्हती या मुद्द्यावर वकिलांची साथ न दिल्याने किवडसन्नावर हे अध्यक्षपदांवर नको यासाठी अविश्वास दाखल करा अशी 455 वकिलानी सह्या करत बार असोसिएशनकडे मागणी केली होती मात्र अद्याप सर्वसाधारण बैठक घेतली गेली नव्हती त्यानंतर वकील सानिकोप्प कोर्टात याचिका दाखल केली होती त्यानुसार शनिवारी अविश्वास ठरावावर मतदान घेण्यात आले.
बार असोसिएशनच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमावरून काही सदस्यांनी नाराजी व्यक्त करत न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने सौहार्दपूर्ण वातावरणात हा उत्सव साजरा करण्याची अपेक्षा व्यक्त केली होती त्यानुसार या ठिकाणी अविश्वास ठरावावर मतदान झाले आणि त्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला. यावेळी कोर्ट कंपाऊंड परिसरात वकील आणि मोठी गर्दी केली होती मोठा पोलीस बंदोबस्त देखील त्यांना करण्यात आला होता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने देखील या ठिकाणी हजेरी लावली होती.




