बेळगाव लाईव्ह :केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क अर्थात राष्ट्रीय संस्थात्मक मानांकन चौकटी (एनआयआरएफ) अंतर्गत जाहीर केलेल्या इंडिया रँकिंग्स -2025 मध्ये बेळगावच्या उच्च शिक्षण संस्थांनी आपली चांगली छाप पाडली आहे.
केएलई अकादमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च, विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, केएलई कॉलेज ऑफ फार्मसी, जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज आणि केएलई विश्वनाथ कत्ती इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेससह बेळगावमधील अनेक आघाडीची महाविद्यालयं आणि विद्यापीठांनी शिक्षण, संशोधन आणि नवोपक्रमातील उत्कृष्टतेसाठी भारतातील आघाडीच्या संस्थांमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 2015 मध्ये शिक्षण मंत्रालयाने स्थापन केलेल्या राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) वर आधारित इंडिया रँकिंग्स 2025 नुकतेच जाहीर केले आहे. याप्रसंगी अनेक उच्च अधिकारी आणि शैक्षणिक नेते उपस्थित होते. केंद्रीय मंत्री प्रधान यांनी क्रमवारी दिलेल्या संस्थांचे अभिनंदन करून एनईपी 2020 अंतर्गत उच्च शिक्षण गुणवत्ता आणि मान्यता वाढविण्यात राष्ट्रीय बेंचमार्क म्हणून एनआयआरएफची भूमिका अधोरेखित केली.
शैक्षणिक संस्थांनी उच्च मानके निश्चित करावीत, नवोन्मेष, उद्योजकतेवर लक्ष केंद्रित करावे आणि 2047 पर्यंत ज्ञान महासत्ता आणि आत्मनिर्भर भारत बनण्याच्या भारताच्या दृष्टिकोनात योगदान द्यावे यावर त्यांनी भर दिला.
मानांकन 2025 : विद्यापीठ (रँक-बँड: 101 -150) केएलई अकादमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगाव.
विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगाव. भारत भारत मानांक 2025 : अभियांत्रिकी (रँक-बँड: 151 -200) विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगाव. केएलई कॉलेज ऑफ फार्मसी, बेळगाव – रँक 50. जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज – रँक 46. केएलई विश्वनाथ कत्ती इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेस – रँक 29. राज्य सार्वजनिक विद्यापीठे
विश्वेश्वरय्या. टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी – रँक 50.




