बेळगाव लाईव्ह :राजधानी बंगळूरच्या ईशान्य भागात असलेल्या ‘शिवाजीनगर मेट्रो’ स्थानकाचे नाव बदलण्याच्या सरकारच्या प्रस्तावामुळे आता राजकीय वादाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाला तीव्र विरोध दर्शविल्याने तर वाद आणखी वाढला आहे. शेवटी, बंगळूर महाराष्ट्रासाठी का महत्त्वाचे आहे, याविषयीही चर्चा सुरू झाल्या आहेत.
बंगळूरमधील सर्वांत जुन्या भागांपैकी एक असलेले शिवाजीनगर हे सांस्कृतिक आणि धार्मिक विविधतेसाठी प्रसिद्ध आहे. येथे प्राचीन प्रार्थनास्थळे आहेत आणि ब्रिटिश काळातील कॅन्टोन्मेंट रेल्वे स्थानकदेखील खूप जुने आहे.
प्रसिद्ध रसेल मार्केट आजही व्यावसायिक केंद्र आहे. शहरातील बहुतेक सरकारी कार्यालये याच भागात केंद्रित असल्याने हे प्रशासकीयदृष्ट्या महत्त्वाचे आहे. येथे कबाब आणि चकणादेखील प्रसिद्ध आहेत. शहरातील सर्वांत जुन्या चर्चपैकी एक असलेले सेंट मेरीज बॅसिलिकादेखील याच परिसरात आहे. कन्या मरियम्मा जन्मोत्सव जत्रा भाविकांना आकर्षित करते.
सिद्धरामय्या यांनी आठ सप्टेंबर रोजी झालेल्या जत्रेत भाग घेतला होता. त्याचवेळी ‘शिवाजीनगर मेट्रो’ स्थानकाला ‘सेंट मेरी’ असे नाव देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आला. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, मेट्रो स्थानकाचे नाव बदलण्याच्या प्रस्तावावर फक्त विचार करण्यात आला आहे. अंतिम निर्णय झालेला नाही. आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे आक्षेप केंद्र सरकारपर्यंत पोहोचवू.
बेळगावात निदर्शने
मुद्द्यावरून बेळगाव आत निदर्शने होणार आहेत शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव बदलून सेंट मेरी पुण्याचा प्रस्तावावर मुख्यमंत्री सिद्धरामया यांच्या भूमिकेनंतर केलेल्या वक्तव्यानंतर हिंदुस्तान च्या वतीने त्या रेल्वेस्थानकाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आज कायम ठेवावे अशी मागणी करण्यात येणार आहे बेळगावचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत हे आंदोलन केले जाणार आहे. सोमवारी सकाळी आंदोलन होणार असून शेकडो श्रीराम सेना हिंदुस्तान संघटनेचे पदाधिकारी यात भाग होणार आहेत.




