बेळगाव लाईव्ह : माळमारुती पोलिसांनी धारदार शस्त्र बाळगणाऱ्या संशयितांना अटक करून त्याच्या जवळील धारदार तलवार जप्त केली आहे.
शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अलीकडील दिवसांत चोरीच्या घटना वाढल्यामुळे, शहरातील शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी संशयित व्यक्तींची तपासणी करत असताना, बेळगाव शहरातील कणबर्गी गावाजवळील क्रिकेट स्टेडियम परिसरात फिरणाऱ्या अटक करून त्यांच्या जवळील तलवार जप करून अटक करण्यात आले.
पोलिसांनी अरुण राम होरकेरी (32), रा.ज्योतिर्लिंग गल्ली, कणबर्गी,विक्रम करप्पा नायक (28), रा. मदकर गल्ली, कणबर्गी. राहुल ज्योतिबा उचगावकर (31), रा. सिद्धेश्वर नगर, कणबर्गी,हे तिघेही त्यांच्या हिरो होंडा मोटारसायकलवर धारदार तलवार बाळगत असल्याचे आढळले पोलिसांनी त्यांच्याकडून शस्त्र तसेच अंदाजे रु.5,000/- किमतीची मोटारसायकल जप्त केली.
सदर प्रकरणी माळमारुती पोलिस ठाण्यात गु.र.नं.180/2025, कलम 27(1) इंडियन आर्म्स अॅक्ट आणि कलम 97 के.पी. अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवून कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
या कारवाईत सहभागी झालेल्या पीएसआय तसेच पोलिस कर्मचाऱ्यांच्या कार्याचे पोलिस आयुक्त, बेळगाव शहर व डीसीपी यांनी कौतुक केले आहे.



