श्री बाल शिवाजी सार्व. वाचनालयाला महाराष्ट्र शासनाची 5 लाखांची मदत

0
22
 belgaum

बेळगाव लाईव्ह :उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्र शासनाकडून श्री बाल शिवाजी सार्वजनिक वाचनालय, मच्छे यांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

शिक्षक दिनी काल शुक्रवारी सदर आर्थिक श्री बाल शिवाजी सार्वजनिक वाचनालय मच्छेच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली. ही मदत मिळवून देण्यासाठी महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी तळमळीने प्रयत्न केल्याबद्दल श्री बाल शिवाजी सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने मंत्री डॉ. उदय सामंत यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

यावेळी बोलताना मराठी भाषा ही ज्ञानाची भाषा असून शिक्षण व प्रगतीच्या सर्व क्षेत्रांना दिशा देणारी आहे. याच मायमराठीच्या संवर्धनासाठी, तसेच मराठमोळी वाचनसंस्कृती जतन करण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत महत्त्वपूर्ण पाऊले उचलली जात असल्याचे मंत्री डॉ. उदय सामंत म्हणाले.

 belgaum

श्री बाल शिवाजी सार्वजनिक वाचनालयाला आर्थिक मदत मिळवून देण्यात रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री. रोहनजी बने तसेच इतर कार्यकर्त्यांनी देखील विशेष परिश्रम घेतले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.