बेळगाव लाईव्ह :डॉ. एम. डी. दीक्षित यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करताना डॉ. सत्तकी नंबाला, डॉ. युगल मिश्रा, डॉ. रजनीश मल्होत्रा, हुसम भालकी आदी.
प्रसिद्ध हृदय शल्यचिकित्सक डॉ. एम. डी. दीक्षित यांना सोसायटी ऑफ मिनीमल इव्हेसिव्ह कार्डिओ व्हॅस्क्यूलर अँड थोरासिक सर्जन ऑफ इंडिया (एसएमआयसीटीएसआय) च्यावतीने मानाचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. बेंगळूर येथील लिला भारती आयोजित सोसायटीच्या ९ व्या वार्षिक परिषदेत मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
गेल्या ४० वर्षांपासून अविरतपणे करत असलेल्या रुग्णसेवेची दखल घेऊन डॉ. एम. डी. दीक्षित यांना हा पुरस्कार बहाल करण्यात आला. कार्यक्रमात डॉ. सत्तकी नंबाला, डॉ. युगल मिश्रा, डॉ. रजनीश मल्होत्रा, आयएसएमआयसीएस अध्यक्ष हुसम भालकी यांच्यासह देश-विदेशातील सर्जन सहभागी झाले होते.
डॉ. एम. डी. दीक्षित यांनी मिनीमल इव्हेसिव्ह कार्डिओ व्हॅस्क्यूलर अँड थोरासिक सर्जरीमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी व उत्कृष्टतेच्या पलिकडे रुग्णसेवा प्रदान केली आहे. डॉ. एम. डी. दीक्षित यांनी गेल्या चार दशकांपासून रुग्णसेवेप्रति समर्पण, कठोर परिश्रम करून अमुल्य योगदान दिले आहे.
जगभरात मिनीमल इव्हेसिव्ह कार्डिओ व्हॅस्क्यूलर अँड थोरासिक सर्जरीच्या विकासातील सर्वोत्कृष्ट योगदान दिले आहे. याद्वारे डॉ. एम. डी. दीक्षित यांनी हजारो रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्या असून याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.





