सार्वजनिक वाचनालया तर्फे रविवारी आचार्य अत्रे पुरस्काराचे वितरण

0
20
 belgaum

बेळगाव लाईव्ह : सार्वजनिक वाचनालया तर्फे दिल्या जाणाऱ्या आचार्य अत्रे साहित्य पुरस्काराचे वितरण रविवार दि. 7 सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता होणार आहे.

वाचनालयाच्या गणपत गल्ली, बेळगाव येथील सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात हा पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक श्री लक्ष्मीकांत देशमुख यांना वाचनालयाचे अध्यक्ष श्री अनंत लाड यांच्या हस्ते बहाल करण्यात येणार आहे. यानिमित्त देशमुख यांचा अल्प परिचय:
मूळचे धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील मुरूम गावचे असलेल्या लक्ष्मीकांत देशमुख यांनी मराठवाडा विद्यापीठातून रसायनशास्त्रातील एम एस सी व कोल्हापूर विद्यापीठातून मराठी साहित्य विषय घेऊन एम ए ही पदवी घेतली. त्यानंतर IIM बेंगलोर मधून एमबीए केले.

अमेरिकेतून इंटरनॅशनल पॉलिसी या विषयावर एक अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर भारतीय प्रशासकीय सेवेत एक अधिकारी म्हणून अनेक वर्षे काम करून ते 2014 साली निवृत्त झाले. प्रशासकीय अधिकारी असताना प्रत्येक प्रश्न त्यांनी संवेदनशीलतेने आणि न्यायबुद्धीने सोडविले त्यातूनच त्यांच्या साहित्यकृती आकार घेत गेल्या.

 belgaum


‘ हरवलेले बालपण’ ही त्यांची बालमजुरी संदर्भातील कादंबरी आणि सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी हा स्त्रीभ्रूणहत्येवरील कथासंग्रह, इन्कीलाब आणि जिहाद या कादंबरीतून समकालीन आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अंतरंग त्यांनी उलगडून दाखवले आहेत. त्यांनी उर्दू शायर साहिर लुधियान्वी आणि कैफी आजमी यांची चरित्रे लिहिली असून शैलेंद्र व श्याम बेनेगाल या प्रगईशील कळावंटावर ते सद्या लिहीत आहेत.त्यांच्या दहा कादंबऱ्या,14 कथासंग्रह ,दोन नाटके आणि इतर 11 संकीर्ण, ललित व संपादित पुस्तके सात अशी एकूण चाळीस पुस्तकांची लक्षणीय साहित्य संपदा असून ते अक्षर अयान आणि आंतर भारती या साने गुरुजी प्रणित मराठी दिवाळी अंकाचे ते दहा वर्षे संपादक होते.


देशमुखची काही महत्वाची रसिक प्रिय पुस्तके पुढील प्रमाणे आहेत
अखेरची रात्र, व दूरदर्शन हाजीर अग्निपथ ही नाटके
,अंतरीच्या गुढगर्भी ,कथांजली, पाणी- पाणी, मृगतृष्णा, सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी, गांधींवादाचा केमिकल लोचा, फ्रीडम ऑन फायर, माणूस नावाचं एकाकी बेट हे कथासंग्रह
आणि अंधेर नगरी, ऑक्टोपस , इन्कीलाब विरुद्ध जिहाद, सलोमी, हरवलेले बालपण, वेदनेचा क्रूस, या त्यांच्या गाजलेल्या कादंबऱ्या आहेत.
स्त्री सूक्त, मधुबाला ते गांधी, हे ललित गद्य आणि भारतीय संविधानावरील सहा संपफिट पुस्तके व नुकतेच प्रकाशित झालेले धर्मवादाची चिकित्सा करणारे ‘ हिंदुत्व नव्हे भारतीयत्व!’ ही संकुरण साहित्य संपदा आहे.हया शिवाय हिंदी व इंग्रजी मधून त्यांनी अनेक साहित्यिक कृतीची निर्मिती केली आहे.
सद्या ते काश्मीर प्रश्नावर त्रि-खंडात्मक महाराष्ट्र कादंबरी लिहीत आहेत
श्री लक्ष्मीकांत देशमुख यांना अनेक पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे.


बडोदा येथे झालेल्या 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले असून नांदेड येथील 36व्या मराठवाडा साहित्य संमेलन , ग्रामीण साहित्य संमेलन विटा, साहित्य संमेलन बेळकुंदी ( बेळगांव ),सांगली येथील पहिल्या लोकजागर साहित्य संमेलन अशा डझनभर sahit संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे.
देशमुखणा महाराष्ट्र शासनाचे तीन पुरस्कार,, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे( पाच पुरस्कार), मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद) ( तीन पुरस्कार पमहाराष्ट्र फाउंडेशन चl पुरस्कार, टाइम्स ऑफ इंडिया सोशल ओनर अवॉर्ड तसेच महाराष्ट्र सरकारचा आदर्श जिल्हाधिकारी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.


असे हे बहुआयामी व्यक्तिमत्व बेळगावकरांच्या भेटीस येत असून त्यांचे “आचार्य अत्रे यांचे भाषा समाज आणि संस्कृती बाबतचे योगदान” या विषयावर व्याख्यान होणार आहे. रसिकांनी उपस्थित राहून या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.