बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये जात आणि सामाजिक सर्वेक्षणाचा आज, आमदार आसिफ सेठ आणि जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. येत्या १६ दिवसांत जिल्ह्यातील १२ लाख घरांचे सर्वेक्षण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
आमदार आसिफ सेठ यांनी हे सर्वेक्षण विकासासाठी असून, यामुळे समाजात फूट पडणार नाही, असे सांगितले. त्यांनी नागरिकांनी अफवांकडे दुर्लक्ष करून यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सर्वेक्षणाच्या तयारीबद्दल माहिती दिली आणि यात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांची प्रशंसा केली. हक्कीपिक्की समाजाचीही माहिती गोळा केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दुर्गम भागांतही हे सर्वेक्षण प्रभावीपणे पूर्ण केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
या अभियानासाठी १०,३०८ शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक शिक्षकाला १५० घरांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.


