बेळगाव लाईव्ह :बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या सहकार्याने शहरातील मध्यवर्तीय सार्वजनिक श्री गणपती उत्सव मंडळ झेंडा चौक, मार्केट बेळगाव यांच्यातर्फे आयोजित ’21 व्या श्री गणेश -2025′ किताबाच्या सौष्ठव स्पर्धेतील बेळगाव जिल्हा आणि ग्रामीण पातळीवरील टायटल अर्थात विजेतेपद अनुक्रमे पॉलिहाइड्रोन जिमच्या व्यंकटेश ताशिलदार आणि सुनील भातकांडे यांनी हस्तगत केले. त्याचप्रमाणे जिल्हास्तरीय ‘बेस्ट पोझर’ किताब सुनील कळ्ळीमणी याने पटकावला.
भाग्यनगर, टिळकवाडी येथील रामनाथ मंगल कार्यालय येथे उपरोक्त स्पर्धा नुकतीच यशस्वीरित्या पार पडली. सदर बेळगाव ग्रामीण व जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. विविध वजनी गटात घेण्यात आलेल्या या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून कर्नल दीपक गुरुंग, उद्योगपती शिरीष गोगटे, बेळगाव जिल्हा शरीर सौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अविनाश पोतदार, चंद्रकांत दोरकाडी, डीसीपी नारायण बरमणी, एसीपी कट्टीमणी, माजी जि.पं. सदस्य रमेश गोरल, विजय जाधव राकेश कलघटगी, मिस्टर एशिया कांस्य पदक विजेते शरीर सौष्ठवपटू किरण वाल्मिकी, श्री गणपती उत्सव मंडळ झेंडा चौकचे अध्यक्ष अमित किल्लेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील यशस्वी शरीर सौष्ठवपटूंना आकर्षक बक्षीसांचे वितरण केले गेले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कर्नाटक राज्य शरीर सौष्ठव संघटनेचे सचिव आंतरराष्ट्रीय शरीर सौष्ठव पंच अजित सिद्दण्णावर, सुनील राऊत यांच्यासह जिल्हा शरीर सौष्ठव संघटनेचे अन्य पदाधिकारी, सदस्य, तसेच झेंडा चौक मध्यवर्तीय सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अमित किल्लेदार, सेक्रेटरी राजू हंगिर्गेकर आणि सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धेचा अंतिम निकाल (अनुक्रमे ग्रामीण व जिल्हास्तरीय विभागामधील पहिले पाच क्रमांकाचे विजेते यानुसार) खालील प्रमाणे आहे.
बेळगाव ग्रामीण विभाग : 60 किलो – आकाश जोगानी (मेणसे फिटनेस), तुषार गावडे (फिटनेस वर्ल्ड), राजकुमार मोटरे (दास जिम मुचंडी), शुभम चौगुले (फिट प्रो), आदर्श कल्लेहोळकर (फिट प्रो). 65 किलो गट -गजानन पाटील (फिट प्रो), अफताब किल्लेदार (गोल्ड लाइफ), वृषभ गावकर (आयुष), साईनाथ नार्वेकर (फ्लेक्स झोन) झुबेर माचीकर (गोल्ड लाईफ). 70 किलो गट -नितेश गोरल (पॉलिहायड्रॉन जिम), रोनक गवस (बॉर्न आऊट), यश भोसले (गोल्डन जिम),








योगेश भडगावी (एनएन फिटनेस मुचंडी). 70 किलो वरील गट -सुनील भातकांडे (पॉलीहायड्रोन जिम), अमर गुरव (फिटनेस फोर्ज), मनीष सुतार (बेळगावकर फिटनेस), ऋतिक पाटील (भैरू फिटनेस), आकाश लोहार (गणेश प्रो). श्री गणेश -2025 टायटल विजेता : सुनील भातकांडे (पॉलीहायड्रोन जिम).
बेळगाव जिल्हा विभाग : 55 किलो गट -सुरज भंडारी (गोल्ड जिम), आकाश जोगानी (मेणसे फिट), चेतन भातकांडे (युनिव्हर्सल), विनायक पत्रुटी (फ्लेक्स जिम), पांडुरंग गुरव (फ्लेक्स खानापूर). 65 किलो गट -गजानन पाटील (फिट प्रो), अनिकेत गरगट्टी (एस. के. फिट), श्रीधर हंडे (बाल हनुमान), निरंजन पाटील (के 16 निपाणी), अफताब किल्लेदार (गोल्ड लाइफ). 70 किलो गट -आकाश साळुंके (रॉयल फिट), नितेश गोरल (कार्पोरेशन जिम), रौणक गवस (बर्न आऊट), शील कुगजी (मंथन जिम),
नागेश चोर्लेकर. 75 किलो गट -व्यंकटेश ताशिलदार (पॉलिहाइड्रॉल जिम), प्रताप कालकुंद्रीकर (पॉलिहाइड्रोन जिम), सुनील भातकांडे (पॉलिहाइड्रॉन जिम), अतीशान खाटीक (एस्ट्रेटिक जिम), मनीष सुतार (बेळगावकर फिट). 75 किलो वरील गट -अमर गुरव (फिट फोर्ज), राहुल कुलाल (स्ट्रिंज स्टुडिओ), गजानन काकतीकर (कार्पोरेशन जिम), डेनिस मेंझीस (फ्लेक्स), दिग्विजय पाटील (फ्लेक्स खानापूर). श्री गणेश -2025 टायटल विजेता : व्यंकटेश ताशिलदार (पॉलिहाइड्रॉल जिम).




