बेळगाव लाईव्ह : बसवण्णांनी लिंगायत धर्माची स्थापना केलेली नाही, असे काही नाटक कंपन्यांनी हे निर्माण केले आहे,असे विधान आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी केले.
शनिवारी चिक्कोडी तालुक्यातील हारुगेरी येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी म्हटले आहे.
“बसवण्णांनी हिंदू समाजातील अंधश्रद्धेविरुद्ध लढा दिला, पण त्यांनी धर्माची स्थापना केलेली नाही.”काही मूर्ख लोक वीरशैव-लिंगायत धर्माला चुकीच्या मार्गावर नेत आहेत. धर्म म्हटले की ‘हिंदू’ असे लिहावे, जात म्हटले की ‘लिंगायत’ किंवा ‘लिंगायतर’ असे लिहावे, धर्म म्हणून वेगळे जाहीर करून पुढच्या पिढीचे भविष्य संपवले जात आहे, असे ते म्हणाले.
“जोपर्यंत केंद्र सरकार वीरशैव-लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता देत नाही, तोपर्यंत वीरशैव-लिंगायत असे लिहिल्याने अर्थ नाही. उद्या सरकारी आरक्षण घेताना ‘वीरशैव’ किंवा ‘लिंगायत’ असा कोणताही धर्म अस्तित्वात नाही. आपल्या संविधानात फक्त धर्मांना आरक्षणाची तरतूद आहे. हिंदू लिहिल्यासच आरक्षण मिळते, लिंगायत लिहिल्यास मिळत नाही, कारण लिंगायत जात म्हणून मान्यता नाही,” असे त्यांनी सांगितले.
सर्व समाजातील लोकांच्या जात हिंदू धर्माच्या अंतर्गत नोंदविल्या आहेत. काही लिंगायत 2A गटात गेले, पण तिथे ‘लिंगायत’ असे लिहिलेले नाही, ‘वीरशैव’ शब्द वापरलेला नाही, तर हिंदू म्हणून उपजात नमूद केली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
“राज्यात काँग्रेस सरकार आल्यानंतर हिंदूंवर दडपशाही होत आहे. मद्धूरपासून राज्यातील हिंदू एकत्र येत आहेत. मुस्लिम समाजाला आरक्षण दिले, मुख्यमंत्री कार्यालयात मुस्लिम अधिकारी आहेत, त्यामुळे सिद्धरामय्यांविषयी शंका निर्माण होते,” असे यत्नाळ म्हणाले.
“आधीच राज्य सरकारने 400 कोटी रुपये पाण्यात घातले आहेत. जात गणनेतच सरकार आपला कार्यकाळ संपवेल, असे दिसत आहे. आज कोणतीही जात स्पष्ट नाही; लिंगायत, कुरुब, ख्रिश्चन असे म्हणत सरकार दिशाभूल करत आहे. या समुदायांची नावे सांगून संपूर्ण हिंदू समाजाला फोडण्याचा आणि अल्पसंख्याकांना बहुसंख्य दाखवण्याचा काँग्रेसचा नियोजित कट आहे. यावर कुणीच आवाज उठवत नाही. पुढे कर्नाटकमध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेत येणार नाही,” असे यत्नाळ यांनी भविष्यवाणी केली.




