बेळगाव लाईव्ह : बेळगावातील कोल्हापूर सर्कलजवळील लक्ष्मी कॉम्प्लेक्सच्या कार पार्किंगजवळ एका महिलेचा खून झाल्याची धक्कादायक घटना मध्यरात्री उघडकीस आली. रात्री उशिरा लक्ष्मी कॉम्प्लेक्सजवळ एका महिलेची निघृण हत्या करण्यात आल्याने हा परिसर हादरून गेला आहे.
वडगावच्या रामनगर येथील महादेवी करेनावर (४५) असे त्या महिलेचे नाव आहे.पीडित महिलेवर कामावरून घरी परतत असताना
प्राणघातक शस्त्राने हल्ला करण्यात आला.
डोक्यालादुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेतील गुन्हेगार फरारआहेत पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.
या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी पोलीस आयुक्त बोरसे आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.
सदर महिलेचा खून तिला लुटण्याच्या उद्देशातून झालाय का? या खून प्रकरणाला अन्य कोणते कारण आहे याचा तपास पोलीस घेत आहेत.सदर घटना ए पी एम सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, पोलीस तपास सुरू आहे.


