त्वरित युरिया वितरित करा; शेतकऱ्यांची मागणी

0
3
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव सह ग्रामीण भागामध्ये शासनाकडून त्वरित एरिया वितरित करा अशी मागणी रयत संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

2025 च्या खरिप हंगामात शेतकऱ्यांनी शेतीची चांगली मशागतही केली नव्हती. त्यातच मे महिन्यापासून मोठा अवकाळी पाऊस सुरु झाला. त्यामूळे शेतकऱ्यांनी गडबडीने खरिप पेरणी केली. त्यावर अतिवृष्टी झाल्याने शेतीत पाणी साचले आणी पाणी-मुळका एक झाला. जमीनीत थंडपणा वाढल्याने अनेक शेतकऱ्यांची पीकं नष्ट झाली तर बळळारीनाला परिसरातील शेतकरी तर पूरताच संपला.

पावसाने जमीनीचा पोत खराब झाल्याने पीकांची वाढ खुंटली. त्यावर युरिया शिंपडल्याशिवाय शेतकऱ्यांना पर्यायच नव्हता. पण युरिया मिळणे कठिण झाले. त्यात सरकारच्या लिंक योजनेमूळे आधिच पिचलेल्या शेतकऱ्यांना जादा भूर्दंड बसला. हजारो शेतकऱ्यांना अजूनही युरिया मिळाल्या नसल्याने त्यांची घालमेल होत कष्ट करुन पेरलेली पीकं तरतिल का याची मोठी चिंता लागून आहे.

 belgaum

अनेक शेतकऱ्यांची पेरणी केलेली बियाणं नष्ट झाली आता दुसऱ्यांदा लावणी करावी लागत आहे. त्यासाठीही जमीनीतील नत्र (नायट्रोजन) संतूलीत राखन अत्यंत गरजेचे आहे असे  शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

शेतकरी पीकांची वाढ होण्यासाठी युरियाचा वापर करतात व त्यानंतर इतर गोळीखतंही वापरतात. अनेक शेतकरी शेणखतं यसेच सेंद्रिय खताचाही वापर सर्रास करतात. पण यावेळी ऐनवेळेला अतिवृष्टी झाल्याने. त्याचा म्हणावातसा उपयोग झालानाही. त्यासाठी आता शेतकऱ्यांना युरियाची अत्यंत गरज आहे. तेंव्हा ताबडतोब बेळगाव शहर व ग्रामीण भागातील शेतकयांना युरियाचे वितरण करुन सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देत लिंक विरहित पुरवठा करुन खंगलेल्या आधार द्यावा अशी मागणी केली आहे.

जर का  प्रशासनाने तात्काळ युरिया उपलब्ध केल्यास  उग्र आंदोलन करुन सरकारला जागे केल्याशिवाय शेतकरी स्वस्थ बसणार नाहीत असा इशारा रयत संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे यावेळी शेतकरी नेते राजीव मर्वे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.