बेळगाव लाईव्ह: सीमा भागात सुरू असलेल्या कन्नड सक्ती संदर्भात आम्ही सीमा भागातील मराठी जनतेच्या पाठीशी आहोत वेळप्रसंग पडल्यास या संदर्भात कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना भेटू आणि कन्नड सक्ती संदर्भात बोलू असं वक्तव्य महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले आहे.
कोल्हापूर दौऱ्यावर आले असता पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेला प्रश्नाला उत्तर देताना सामंत बोलत होते.
सीमा भागात सुरू असलेल्या कानडी सक्ती संदर्भात कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिवसेनेच्या सहकाऱ्यांसोबत स्वतः बेळगावला जाऊ आणि बेळगाव येथील मराठी भाषिकांची भेट घेऊ असे देखील त्यांनी यावेळी नमूद केलं.

सोमवारी 11 ऑगस्ट रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने कन्नड सक्ती विरोधात मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे त्या पार्श्वभूमीवर सामंत यांच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
मागील काही काळात देखील सामंत त्यांनी बेळगावला येऊन मराठी भाषिकांशी बोलून चर्चा करू असे आश्वासन दिले होते मात्र अद्याप ते बेळगावपर्यंत पोहोचले नाहीत मात्र यावेळी महाराष्ट्रातील मंत्री बेळगाव पर्यंत पोहोचतील का?मराठी जनतेच्या यांच्या भावना जाणून घेतील का याकडे सीमा वासीयांच्या नजरा टिकून राहिल्या आहेत.


