बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील बडेकोळमठ येथील राष्ट्रीय महामार्गावरील घाटाजवळ बुधवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. दोन गंभीर जखमी झाल्याची घटना घडलीय आहे हुबळीवरून पुण्याकडे निघालेली गोगटे बस उलटल्याने ही दुर्घटना घडली.
चालकाच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या या अपघातात एका महिलेसह एका पुरुषाचा मृत्यू झाला आहे. बसमध्ये एकूण १२ प्रवासी होते. अपघातानंतर हिरेबागेवाडी पोलिस ठाण्याचे कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करून बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना वाचवले.अपघातात बस चालक बचावला आहे . बचावलेले प्रवासी तसेच जखमींना त्वरित बेळगाव बीआयएमएस (BIMS) रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ही घटना हिरेबागेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.
अपघातील एक महिला आणि एक पुरुष आहे हिना सलीम शेख मुल्ला वय 31 मूळची गदग येथील सध्या पुणे येथे वास्तव्यात असलेल्या महिलेचा या अपघातात मृत्यू झाला आहे तर अन्य एका पुरुष मयताची अद्याप ओळख पटलेली नाही अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.


हिरेबागेवाडी घाटात वारंवार होत असलेल्या अपघातामुळे बेळगाव पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी स्वतः जातीने लक्ष घालत अपघात झोन ठरलेल्या ठिकाणी अंधारात वाहन चालकांना त्रास होऊ नये यासाठी उपाय योजना केल्या होत्या त्यामुळे ठिकाणी अपघात संखय कमी झाली आहे मात्र हा अपघात घाटातील त्या धोकादायक ठिकाणी झाला नसून अन्य ठिकाणी झाला आहे.


