बेळगाव लाईव्ह :शहापूर, बेळगाव येथील श्री तुकाराम को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या सहकारी बँकेची 74 वी वार्षिक सर्वसाधारण सभा काल रविवारी सकाळी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
महात्मा फुले रोड, शहापूर येथील तुकाराम बँकेच्या श्री अर्जुनराव मेघोजीराव दळवी सभागृहामध्ये आयोजित या बैठकीच्या अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन प्रकाश मरगाळे हे होते. यावेळी व्यासपीठावर बँकेचे सर्व संचालक उपस्थित होते. प्रारंभी बँकेचे व्यवस्थापक संकोच कुंदगोळकर यांनी उपस्थित सर्व सभासदांचे बँकेच्यावतीने स्वागत केले. सभेच्या सुरुवातीला अहवाल साली बँकेच्या मयत झालेल्या सभासद व हितचिंतकांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर बँकेचे ज्येष्ठ संचालक प्रदीप ओऊळकर यांनी अहवाल वाचन, त्याचप्रमाणे बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक प्रवीण पाटील यांनी गेल्या वर्षीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचन केले. त्याला उपस्थित सर्व सभासदांनी सर्वानुमते मान्यता दिली. यावेळी बँकेचे शाखा प्रबंधक सागर हावळाणाचे यांनी ताळेबंद व नफा-तोटा पत्रक सादर केले. कर्ज अधीक्षक रणजीत शिंदे यांनी सन 2025 -26 सालचे अंदाजपत्रक सादर केले. त्याचप्रमाणे सहाय्यक व्यवस्थापक संदीप मोरे यांनी लेखापरीक्षण अहवालाचे वाचन केले. त्याला सभासदांनी चर्चा करून व कांही मौलिक सूचना करून सर्वानुमते मंजुरी दिली.
सर्वसाधारण सभेत बँकेचे ज्येष्ठ सभासद शिवाजी तारीहाळकर, रघुनाथ बांडगी, शिवाजी कुडूचकर वगैरेंनी बँकेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करून कांही महत्त्वाच्या सूचना मांडल्या, ज्यांची नोंद घेण्यात आली. अध्यक्षीय भाषणात चेअरमन प्रकाश मरगाळे यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा घेऊन सभासदांनी दिलेले सहकार्य व दाखविलेल्या विश्वास याबद्दल समाधान व्यक्त केले. सभेला बँकेचे व्हा. चेअरमन नारायण पाटील, संचालक राजू बाळेकुंद्री, प्रवीण जाधव, विजय पाटील, महादेव सोंगाडी, सुनील आनंदाचे, संदीप मुतकेकर, राजू मरवे, वंदना धामणेकर, पल्लवी सरनोबत, सभासद गोपाळ हंडे, लक्ष्मण गणू मेणसे, महेंद्र माने, विनोद आंबेवाडीकर, गजानन मजुकर, जयंत खन्नूकर, बाबू कोले, वैजनाथ पाटील, कलाप्पा नाकाडी आदींसह बहुतांश सभासद उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन बँक व्यवस्थापक संकोच कुंदगोळकर यांनी केले, तर शेवटी संचालक मोहन कंग्राळकर यांनी सर्वांचे आभार मानले.


