बेळगाव लाईव्ह : बेळगावची टेबल टेनिस खेळाडू तनिष्का काळभैरव हिने विविध स्पर्धात पदके मिळवत मिळवत घळघवीत यश संपादन केले आहे.
नुकताच म्हैसूर येथे झालेल्या कर्नाटक राज्य रँकिंग टूर्नामेंटमध्ये तनिष्काने दोन सुवर्ण आणि एक रोप्य पदकाची कमाई केली आहे तिने १५ वर्षांखालील आणि १७ वर्षाखालील गटात सुवर्णपदक तर १९ वर्षांखालील गटात रौप्य पदकाची कमाई केली आहे.
यांशिवाय तिने २८ ते ३० जुलै दरम्यान हाँगकाँग येथे झालेल्या वर्ल्ड टेबल टेनिस (WTT) युथ कंटेंडर स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले, जिथे तिला१३ वर्षांखालील गटात कास्यपदक मिळाले आहे.

जपान, चायनीज ताइपे आणि हाँगकाँगच्या अव्वल खेळाडूंविरुद्ध खेळण्याची तनिष्काची ही पहिलीच वेळ होती. हे यश फक्त पदक जिंकण्यापुरते मर्यादित नव्हते, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्यासाठी काय लागते हे समजून घेण्याचा अनुभव होता. यामुळे तिला प्रगतीसाठीच्या क्षेत्रांचा अंदाज आला आणि जागतिक स्तरावर ती कुठे आहे याची स्पष्टता मिळाली.तिचे प्रशिक्षक संगम बैलूर यांनी तिच्यासोबत प्रवास केला आणि तीव्र सामन्यांमध्ये तसेच अपरिचित स्पर्धकांविरुद्ध तिला मार्गदर्शन करत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे कांस्यपदक मिळवणे शक्य झाले.
तनिष्का हिला सिस्टर रोसम्मा (प्राचार्य, डिव्हाइन प्रॉव्हिडन्स स्कूल) शिक्षिका सिल्विया (क्रीडा शिक्षिका) फिटनेस प्रशिक्षक संध्या पाटील, ज्यांनी तिची शारीरिक सहनशक्ती वाढवली त्यांचे मार्गदर्शन लाभले असून वेगा हेल्मेटसचे प्रायोजकत्व मिळाले आहे.


