बेळगाव लाईव्ह :आकाशात हवेत इंधन गळती लागल्यामुळे बेळगावहून मुंबईला जाणाऱ्या स्टार एअरच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग करावी लागण्याची घटना आज शनिवारी घडली.
स्टार एअरलाइन्सचे विमान एस5111 हे आज सकाळी बेळगाव 41 प्रवाशांना घेऊन बेळगावहून मुंबईला निघाले होते.
उड्डाणानंतर कांही वेळातच विमानाच्या इंजिनमध्ये यांत्रिक बिघाड होऊन हवेतच इंधन गळती सुरू झाल्यानंतर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.
वैमानिकाने प्रसंगावधान राखून जलद गतीने आवश्यक कृती करत सुरक्षित लँडिंग केल्यामुळे विमानातील सर्व 41 प्रवाशांचे प्राण वाचले आहेत.


