युवकावरील हल्ल्याप्रकरणी 7 जण अटक, 2 अद्याप फरारी

0
15
Police logo
 belgaum

बेळगाव लाईव्ह :शिवाजीनगर, बेळगाव येथील साई मंदिराजवळ कुणाल राजेंद्र लोहार (वय 21) या युवकावर काल दुपारी क्षुल्लक कारणावरून झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी मार्केट पोलिसांनी 7 जणांना अटक केली असून दोन जण अद्याप फरारी आहेत.

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे सुदर्शन रामा पाटील (वय 19, लक्ष्मी गल्ली, भुतरामनहट्टी), भीमराया हलप्पा गुंजगी (वय 23, रा. भुतरामनहट्टी), दुर्गाप्पा सत्यप्पा पाटील (वय 21, रा. भुतरामनहट्टी), सचिन भीमराया कातबळी (वय 21, रा. भुतरामनहट्टी), प्रकाश संभाजी लोहार (वय 25, रा. भुतरामनहट्टी), श्रीधर रायप्पा होंडाई (वय 31, रा. भुतरामनहट्टी) आणि राकेश हुल्याप्पा बुडागा रा. वाल्मिकी गल्ली, मुत्यानट्टी, बेळगाव) अशी आहेत.

या सात जणांनी आपल्या दोन अज्ञात साथीदारांसह हिंसक हल्ला करण्यापूर्वी प्रथम कुणालला दोरीने ओढल्यानंतर सुदर्शनने त्याच्या डोक्यावर धातूच्या रॉडने वार केल्याचे समजते. तसेच भीमराया याने केबल वायरने त्याच्या पाठीवर हल्ला केला आणि इतरांनीही हल्ल्यात सामील होऊन कुणाल याला गंभीरित्या जखमी केले.

 belgaum

सदर हल्ल्याची माहिती मिळताच मार्केट पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महांतेश धामन्नावर आणि त्यांच्या पथकाने तातडीने कारवाई कारवाई करत उपरोक्त सात आरोपींना अटक केली.

तसे त्यांच्यावर गुन्हा क्रमांक 160/2025 अंतर्गत भा.द.वि. कलम 189()2, 191(2), 191(3), 109, 118(1), 115 (2), 352, 351(3) आणि 190-2023 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे देखील जप्त केले असून त्यामध्ये एक रॉड, केबल वायर, एक पल्सर मोटरसायकल आणि गुन्ह्याशी संबंधित 80,000 रुपये रोख यांचा समावेश आहे. सध्या फरार असलेल्या उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.