बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील गोडची गावात एका दलित तरुणाला झाडाला बांधून मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे.
जमिनीच्या वादावरून गावातील सवर्ण समुदायातील काही लोकांशी वाद असलेल्या विठ्ठल लक्ष्मण नायकर या तरुणाचे दुचाकीवरून अपहरण करून त्याला झाडाला बांधून मारहाण करण्यात आली.
आरोपींनी गॅस पाईप आणि दोरीने त्याला बेदम मारले, असा एक आरोप होत आहे. तर, दुसरीकडे, विठ्ठलने एका तरुणीची छेड काढल्यामुळे त्याला मारहाण करण्यात आल्याचा आरोपही केला जात आहे.
या दोन्ही आरोपांमुळे गावात तणावाचे वातावरण आहे. रामदुर्ग तालुक्यातील कटकूळ पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार आणि प्रति-तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

