अपुऱ्या, मनमानी बस सेवेच्या निषेधार्थ अभावीपचे आंदोलन

0
6
 belgaum

बेळगाव लाईव्ह : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणाऱ्या कर्नाटक परिवहन मंडळाच्या अपुऱ्या व मनमानी बस सेवेच्या निषेधार्थ आणि हालगा, खनगाव वगैरे गावांसाठी सकाळच्या व संध्याकाळच्या सत्रात ज्यादा व नियमित बससेवा सुरू करावी, या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नेतृत्वाखाली बेळगाव तालुक्यातील संतप्त विद्यार्थी -विद्यार्थिनींनी आज शहरात आंदोलन छेडले.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभावीप) नेतृत्वखाली कर्नाटक परिवहन मंडळाच्या अपुऱ्या व मनमानी बस सेवेच्या निषेधार्थ शनिवारी सकाळी शहरातील राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे छेडण्यात आलेल्या आंदोलनात विविध महाविद्यालयांचे बेळगाव तालुक्यातील बहुसंख्य विद्यार्थी -विद्यार्थिनी सहभागी झाले होते.

हातात अभावीपचा ध्वज आणि बॅनर घेऊन सहभागी झालेल्या या मुला-मुलींनी न्यायाची मागणी करत जोरदार निदर्शने केली. कर्नाटक परिवहन मंडळाच्या अपुऱ्या बस सेवेचा फटका बेळगाव तालुक्यातील बऱ्याच गावातील विद्यार्थ्यांना बसत आहे. हालगा वगैरे सारख्या गावामध्ये महाविद्यालये सकाळी 8:30 वाजता सुरू होत असल्यामुळे विद्यार्थी -विद्यार्थिनी सकाळी 6-7 वाजल्यापासून बसच्या प्रतीक्षेत थांबलेले असतात. तथापि बसेस वेळेवर येत नसल्यामुळे आणि येणाऱ्या बसेस न थांबता पुढे निघून जात असल्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयात पोहोचण्यास 11 वाजता आहेत. परिणामी पहिले दोन-तीन वर्ग चुकत असल्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

 belgaum

खनगाव सारख्या काही गावांना तर सकाळच्या सत्रात एखाद दुसरीच बस असल्यामुळे तेथील विद्यार्थी -विद्यार्थिनींची मोठी गैरसोय होत असते. या संदर्भात वेळोवेळी तक्रार करून देखील परिवहन मंडळाकडून कोणतीही सुधारणा केली जात असल्यामुळे संतप्त विद्यार्थी -विद्यार्थिनी आज चन्नम्मा सर्कल येथे निदर्शने करण्याबरोबरच रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन करण्याद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

आंदोलनस्थळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना हालगा व खनगाव येथील त्रस्त विद्यार्थिनींनी त्यांच्या गावच्या बसच्या समस्येबद्दल माहिती दिली. गावातील बस थांब्याच्या ठिकाणी सकाळी लवकर येऊन थांबून देखील बस वाहक व चालक मनमानी करत बस न थांबवता पुढे निघून जातात. जा विचारल्यास तुमच्या दप्तराच्या बॅगेमुळे अडचण होते असे उत्तर उत्तर देतात. बस वेळेवर मिळत नसल्यामुळे महाविद्यालयाला उशिरा पोहोचल्यामुळे आमचे अभ्यासाचे वर्ग बुडत आहेत.

महाविद्यालयात सकाळी 8:30 वाजता पोहोचण्याऐवजी आम्हाला 11 वाजत असल्यामुळे प्राध्यापक वर्गाकडून देखील बोलणी खावी लागतात. त्यामुळे हालगा गावाला सकाळच्या सत्रात अर्ध्या तासाला एक याप्रमाणे ज्यादा बसेसची सोय करावी अशी मागणी हालगा व खनगाव येथील विद्यार्थिनींनी केली. विद्यार्थ्यांच्या आजच्या आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.