बेळगाव लाईव्ह : एका युवतीच्या वादातून तरुणांच्या टोळक्याने एका तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी छत्र. शिवाजी नगरमध्ये घडली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणावर सध्या जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
शिवाजी नगर येथील कुणाल लोहार (२०) असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. उद्यमबागमध्ये काम करणारा कुणाल गुरुवारी जेवण करण्यासाठी घरी परत येत होता. त्याच वेळी मुत्यानट्टी येथील १० ते १५ तरुणांच्या टोळक्याने त्याच्यावर अचानक हल्ला केला.
या हल्ल्यात कुणालच्या डोक्यावर आणि पाठीवर गंभीर जखमा झाल्या आहेत.
मारहाणीदरम्यान लोक जमा होऊ लागल्याने हल्लेखोर पळून गेले. ही घटना मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.


