बेळगाव लाईव्ह :सर्वकाही ऑनलाइन झाले आहे. यामुळे आजकाल अन्नपदार्थ, दूध, फळे आणि इतर वस्तू ऑनलाइन खरेदी करण्यावर नागरिकांचा भर आहे. मात्र स्थानिक व्यापारी यामध्ये मागे पडू लागले आहेत. याचा विचार करून स्थानिकांच्या मदतीसाठी फटाफट या कंपनीने पुढाकार घेतला आहे.
फटाफट या मोबाईल ॲप्लिकेशनवर आपल्याला आता जेवण, स्नॅक्स, दूध, फळे, चिकन, मटण, मासे आदी वस्तू ऑनलाइन विकण्याची संधी मिळणार आहे.
छोटे छोटे दुकान, गाळे, घरच्या घरी जेवण तयार करणाऱ्या व्यक्ती यांनी आता या ऍप्लिकेशन च्या माध्यमातून ऑनलाइनवर यावे. यासाठी विनामूल्य व्यवस्था असून आपण फक्त पदार्थ तयार करून दिल्यावर कंपनीचे डिलिव्हरी बॉईज ते पदार्थ घरोघरी नेऊन पोचवणार आहेत.
यासाठी आपल्याला फक्त पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक अकाउंट माहिती, ईमेल आयडी, संपूर्ण पत्ता, जीएसटी नंबर आणि फूड लायसन्स याची माहिती द्यायची आहे. विशेष म्हणजे जीएसटी आणि फूड लायसन्स नसलेले विक्रेते सुद्धा यामध्ये येऊ शकतात.
यामध्ये विनामूल्य नोंदणी करण्याची शेवटची मुदत रविवार दि. 3 रोजी दुपारी 12 पर्यंत असून यासाठी आपली माहिती 8880425446 या क्रमांकावर व्हॉट्सॲप वर पाठवावी असे आवाहन फटाफट तर्फे करण्यात आले आहे.



