बेळगाव लाईव्ह : आजकाल समाज माध्यमांवर स्पर्धेतून एकमेकांच्या बातम्या कॉपी पेस्ट करणाऱ्या खोट्या बातम्यांचे पेव फुटले असताना त्याच बरोबर कोणत्याही बातमीची शहानिशा न करता बातम्या व्हायरल करण्याची चुकीची पद्धत रूढ होऊ पाहात आहे त्याच बरोबर काही न्यूज पोर्टल दुसऱ्या पोर्टल किंवा माध्यमांवरील जशास तश्या किंवा काहीसे बदल करून वाचकांच्या माथ्यावर मारत आहेत. पत्रकारितेतील हा चुकीचा पायंडा समाजाला घटक आहे हे शुक्रवारी पुन्हा एकदा पाहायला मिळाले.
शुक्रवारी खानापूर मधील देखील एक चुकीची माहिती समाज माध्यमावर व्हायरल झाल्याचा प्रकार समोर आला आहे. व्हायरल होत असलेल्या बातमीचा दुजोरा शासकीय अधिकाऱ्यानी देखील दिला होता मात्र त्याबाबतची बरीच माहिती चुकीची असल्याचे स्पष्टीकरण ग्रामस्थांनी केले आहे त्यामुळे पुन्हा एकदा समाज माध्यमावर चुकीच्या बातम्या व्हायरल होत असल्याचे समोर आले आहे. खानापूर तालुक्यातील भिमगड अभयारण्यात वसलेल्या कोंगळा येथील व्यंकट गावकर या 65 वर्षीय वृद्धाला बेळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची व्हीडिओ बातमी सध्या सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहे. इतकेच नव्हे तर जिल्हाच्या मोठ्या अधिकाऱ्यानी देखील या बातमीला दुजोरा दिला होता मात्र, ही सर्व माहिती अपूर्ण व चुकीची असल्याचे स्थानिक नागरिकांनी स्पष्ट केले आहे.
या बाबतीत खानापूर मधील एका वेब पोर्टलने कोंगळा येथील नागरिक सूर्याजी पाटील यांच्याशी संपर्क साधून वस्तुस्थिती जाणून घेतली असता, वृत्त संपूर्णपणे खोटं व दिशाभूल करणारे असल्याचे स्पष्ट झाले. व्यंकट गावकर यांना बेळगाव रुग्णालयात नेण्यात आलेच नव्हते. अनेक उपचार करूनही उपयोग होत नसल्याने त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर झाली होती. त्यामुळे नातेवाईक व गावकरी यांच्यातील समजुतीनुसार त्यांना रिक्षाने नेरसेपर्यंत आणि तेथून लाकडी तरफे वरून मूळ गावी कोंगळा येथे नेण्यात आले.
यावेळी वृद्धाचे वय 52 वर्षे असल्याचे भासवले गेले, ते देखील चुकीचे असून वास्तविक वय 65 वर्षे आहे. व्यंकट गावकर हे कायम आजारी राहत असल्याने त्यांनी उपचारासाठी आपल्या जावयाच्या (मुलीच्या) घरी खानापूर येथील गणेबैल येथे वास्तव्यस होते गेल्या एक वर्षापासून गणेबैल या ठिकाणी राहून उपचार घेत होते. परंतु उपचाराचा काहीही उपयोग न होता, त्यांची प्रकृती अत्यंत ढासळल्याने शेवटी गावकऱ्यांनी त्यांना त्यांच्या मूळ गावी परत नेण्याचा निर्णय घेतला.त्यावेळे त्यांना जंगलातून घरी नेण्यात आले होते त्यावेळेचे चित्रीकरण करून चुकीची माहिती समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात आली आहे.
दरम्यान, सरकार सध्या भिमगड अभयारण्यातील गावांचे पुनर्वसन करण्याच्या हालचाली करत आहे. या पार्श्वभूमीवर सदर घटनेचा वापर करून राजकीय भांडवल करण्याचा प्रकार घडत असल्याची चर्चा सुरु आहे. सध्या तरी कोंगळा ग्रामस्थांनी अद्याप पुनर्वसनाबाबत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रामसभा बोलावून पुनर्वसनाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे त्याअगोदर अशी बातमी व्हायरल झाल्याने याबाबत जोरदार चर्चा देखील सुरु झाली आहे.




