नातवा पाठोपाठ आजोबाचेही निधन

0
18
 belgaum

बेळगाव लाईव्ह: विदेशात सेवा बजावणाऱ्या नातवाच्या मृत्यूचा धसका घेत आजोबांनीही जीव सोडल्याची घटना बेळगाव शहरात घडली आहे

आखाती देशात नोकरी करत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेल्या नातवाचे अंतिम संस्कार झाले नसताना नातवाच्या अकाली मृत्यूचा धसका घेत आजोबाचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बेळगाव शहरातील अनगोळ येथे घडली आहे.

त्या दुर्दैवी नातवाचे नाव नकुल उदय चौगुले वय 25 तर आजोबाचे नाव अर्जुन चौगुले असे आहे. एकाच घरातील दोन सदस्यांचा अचानकपणे दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटने नंतर या घटनेबाबत अनगोळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 belgaum

याबाबत समजलेल्या अधिक माहितीनुसार नकुल उदय चौगुले हा कुवेत मध्ये हॉटेल मॅनेजमेंट करत एका हॉटेलमध्ये नोकरी करत होता.

बुधवार 12 ऑगस्ट रोजी कुवेत येथे त्याचे हृदयविकाराने निधन झाले होते त्याचा मृतदेह मंगळवारी पहाटे गोवा मार्गे बेळगावला येणार होता त्याच्यावर अंतिम संस्कार व्हायच्या अगोदरच नकुल याचे आजोबा अर्जुन यल्लाप्पा चौगुले वय 86 यांचेही सोमवारी सकाळी झाले. सोमवारी सायंकाळी अनगोळ येथील स्मशानभूमी त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. सहा दिवसांपूर्वी मयत झालेल्या नातवाचे पार्थिव कुवेत वरून बेळगावला यायच्या आतच आजोबा अर्जुन यांचेही निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

कुवेत येथे मयत झालेल्या नकुल याचा मृतदेह मंगळवारी सकाळी गोवा मार्गे बेळगावला आणला जाणार आहे मंगळवारी सकाळी 11वाजता त्याच्या पार्थिवावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत.मयत नकुल याच्या पश्चात आई वडील, काका काकू ,भावोजी आणि बहीण असा परिवार आहे. गुरुवारी सकाळी 8 वाजता रक्षा विसर्जन करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.