बेळगाव लाईव्ह :बेळगावातून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळाला आहे. मराठा आरक्षणासाठी लढा देत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला बेळगावातून पाठिंबा देण्यासाठी पिरनवाडीतील मराठा कार्यकर्ते मुंबईला रवाना झाले आहेत.
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी आणि मराठा आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला बेळगाव जिल्ह्यातून पाठिंबा मिळत आहे.
सध्या मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन शांततेत सुरू असून, त्यांनी मराठा समाजातील तरुणांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे. या आंदोलनात मराठा समाजातील महिला, वृद्ध, आणि तरुणांचा मोठा सहभाग दिसत आहे. त्यांनी सरकारला मराठा आरक्षणाची मागणी मान्य करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी दिला असून, या काळात योग्य निर्णय न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

बेळगाव जिल्ह्यातील मराठा समाजाने मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेचे जोरदार समर्थन केले आहे. मराठा आरक्षणाचा हा लढा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून, देशभरातील मराठा समाजासाठी महत्त्वाचा आहे. या लढ्याला बळ देण्यासाठी आणि आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी पिरनवाडीतील कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत.
मुंबईतील आंदोलनात मारुती राऊत,,विनायक उसूलकर,विनायक उचगावकर,योगेश राऊत,प्रल्हाद्द मुचंडीकर, प्रवीण कंग्राळी,सुनील मच्छे आदी सहभागी होते.
[29/08, 15:54] Muchandikar Pirnwadi: रामा कांग्राळी




